इनरव्हील क्लबकडून विद्यार्थिनीला सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:34+5:302021-03-10T04:38:34+5:30

कऱ्हाड : विद्यानगर येथील रेणुका कांबळे या विद्यार्थिनीच्या आई व वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ती अकरावीमध्ये शिकत ...

Bicycle to the student from the Inner Wheel Club | इनरव्हील क्लबकडून विद्यार्थिनीला सायकल

इनरव्हील क्लबकडून विद्यार्थिनीला सायकल

Next

कऱ्हाड : विद्यानगर येथील रेणुका कांबळे या विद्यार्थिनीच्या आई व वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ती अकरावीमध्ये शिकत असून गाडगे महाराज महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. इनरव्हील क्लब ऑफ कऱ्हाडकडून शिक्षणासाठी तिला सायकल भेट देण्यात आली. क्लबच्या आयएएस श्रुती जोशी, प्रेसिडेंट छाया पवार यांनी पुढाकार घेऊन तिला सायकल दिली. महिला दिनाचे औचित्य साधून क्लबमधील सर्व सदस्यांच्या सासू आणि आईचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहेश्वरी जाधव, रंजना माने, वृषाली पाटणकर, अलका शिंदे, चांदणी लदाणी, भाग्यश्री पवार, विजयश्री मोहिते, पुष्पा चौधरी, अश्विनी कोळी, संगीता पाटील, मनीषा पाटील, आरती कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

कऱ्हाडच्या आठवडी बाजारात गर्दी वाढली

कऱ्हाड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना शहरात गुरुवारी व रविवारी भरणारा आठवडी बाजार मात्र गर्दीने फुलत आहे. रविवारी आठवडी बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. व्यापारी व शेतकऱ्यांनी घातलेले मास्क गळ्यात लटकताना दिसत होते. ठरावीक लोकच मास्कचा वापर करताना दिसून आले. भाजी मंडई भरण्याची व्यवस्था नसल्याने प्रभात चित्रपटगृहासमोर प्रत्येक रस्त्यावर शेतकरी व व्यापारी शेतमाल विक्रीसाठी बसलेले होते. गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. कऱ्हाड पालिका पावती फाडते. मात्र, शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सुविधा पुरवत नाही, असा आरोप केला जात आहे.

कऱ्हाडला नवीन कृष्णा पुलाच्या कामाला गती

कऱ्हाड : येथील कृष्णा नाका ते कृष्णा कॅनॉलदरम्यान होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम गतीने सुरू झाले आहे. एप्रिलअखेर हा नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियोजन आहे. अनेक महिन्यांपासून नवीन कृष्णा पुलाचे काम कासवगतीने सुरू होते. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने काही महिने काम बंद होते. या पुलावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. नवीन पुलाचे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी नागरिकांनी महामार्ग रस्ते विभागाकडे मागणी केली होती. याची दखल घेऊन पुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये कार्यशाळा

कऱ्हाड : येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर इतिहास विभागाच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. भारतभूषण माळी यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. आर. सावंत होते. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख नेताजी सूर्यवंशी यांनी केले. कार्यशाळेसाठी स्वाती सरोदे, सचिन बोलाईकर, मारुती तांबे, संदीप महाजन यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

ओगलेवाडी येथे स्कूल कनेक्ट कार्यक्रम

कऱ्हाड : ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील आत्माराम विद्यामंदिरमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी तसेच तंत्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा समन्वयक प्रा. रजनीश पिसे, सहसमन्वयक प्रा. मनीष भट, तालुका समन्वयक प्रा. देवदत्त शिंगारे, सुनील खेर आदींनी मार्गदर्शन केले. सादरीकरणाद्वारे तंत्रशिक्षणाची देशाच्या विकासात भूमिका यावेळी विशद करण्यात आली. प्रा. सुनीता इंगोले यांनी मार्गदर्शन केले. महेश कुंभार, उद्धव जाधवर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Web Title: Bicycle to the student from the Inner Wheel Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.