बिदाल ही एक आदर्श शाळाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:43 AM2021-08-21T04:43:49+5:302021-08-21T04:43:49+5:30
दहिवडी : ‘बिदाल म्हणजे एक आदर्श शाळा आहे. या गावातून भरपूर काही घेण्यासारखे आहे. ज्याला बिदाल काय आहे हे ...
दहिवडी : ‘बिदाल म्हणजे एक आदर्श शाळा आहे. या गावातून भरपूर काही घेण्यासारखे आहे. ज्याला बिदाल काय आहे हे समजलंय त्याला सगळंच समजलंय, असे समजायला हरकत नाही’, असे गौरवोद्गार आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
बिदाल येथील सचिवालयाचे उद्घाटन गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, डॉ. भारती पोळ, दहिवडीचे नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे, प्रशांत खैरमोडे, उपअभियंता संजय खोत, मोहन घार्गे, नरेंद्रजी मेडेवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, बाळासाहेब सावंत, नंदू खोत, नंदकुमार फडतरे, अपर्णा भोसले, सरपंच गौरी शीतल जगदाळे, उपसरपंच सविता कुलाळ उपस्थित होत्या.
गोरे म्हणाले, ‘राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी एकत्र येण्याची परंपरा बिदालमध्ये आहे. या गावाने पाणी फाऊंडेशनमध्ये ज्या गावाला मदत केली, त्या गावाचे नंबर आले. सचिवालयाची इमारत पश्चिम महाराष्ट्रात नसेल अशी वस्तू उभी केले. हे माझे गाव आहे. मला या गावाने तीनवेळा आमदार केले.’
प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘चांगले काम आणि पारदर्शकपणा ही खरी ओळख आहे. या गावाएवढे अधिकारी राज्यात कुठेच नसतील, अनेक विचारांची मंडळी आहेत पण विकासकामात सर्वजण गटतट विसरुन एकत्र येतात. सर्व सोयीनींयुक्त अशी वास्तू कुठेच पाहायला मिळणार नाही.’
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. अशोक इंगवले यांनी प्रास्ताविक केले. हणमंतराव जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले तर आप्पा देशमुख यांनी आभार मानले.
चौकट
मीही बिदालचा
बिदाल गावातून अधिकारी, शिक्षक, अभियंते, डॉक्टर यासह विविध क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांची यादी वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर ‘बिदालचा एक आमदार आहे, मी पण बिदालचाच आहे, असा उल्लेख का करत नाही. मी इथे शिकलो, माझी जमीन आहे. मी सोसायटीचा सभासद आहे’, याचीही आमदार गोरे यांनी आठवण करुन दिली.
फोटो
२० बिदाल
बिदाल ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रभाकर देशमुख, भगवानराव जगदाळे, प्रदीप विधाते उपस्थित होते. (छाया : नवनाथ जदाळे)