साताऱ्यात भीषण अपघात, गणेश खिंड परिसरात ५०० फूट दरीत कार कोसळली; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:05 AM2024-08-02T11:05:35+5:302024-08-02T11:11:46+5:30

Satara Accident : या तरुणांचा एक अपघाताआधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ते तरुण धमाल करत असल्याचे दिसत आहे. 

Big accident in Satara, car falls in 500 feet gorge at Yavateshwar Ghat; death of one | साताऱ्यात भीषण अपघात, गणेश खिंड परिसरात ५०० फूट दरीत कार कोसळली; एकाचा मृत्यू

साताऱ्यात भीषण अपघात, गणेश खिंड परिसरात ५०० फूट दरीत कार कोसळली; एकाचा मृत्यू

Satara Accident ( Marathi News ) :  सातारा-कास मार्गावरील गणेश खिंड परिसरात दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातग्रस्तांसाठी सुरू झालेले बचाव कार्य शुक्रवारी पहाटे साडे चारच्या सुमारास संपले. दरम्यान, या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

कल्याणमध्ये मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्यांचे नुकसान, दोन जण जखमी

पोलिसांच्या माहितीनुसार चिमणगाव, ता. कोरेगाव येथील सातजण गुरूवारी कास पठारावर गेले होते. त्यानंतर जेवण करुन ते साताऱ्याकडे कार ( एमएच, ११. सीक्यू, ९५७९) मधून येत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास सातारा-कास मार्गावरील गणेश खिंड परिसरात चालक विशाल संजय भगत (वय ३०) याला रस्त्यावरील धुक्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजुला वळून सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळली. त्यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे पोलिसांनीही घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.

गुरूवारी रात्रीच्या सुमारास सातारा तालुका पोलिस, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सने बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर कारमधील सर्वांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये ओमकार सुभाष भगत, विशाल संजय भगत, अक्षय नारायण भगत, दिनेश तानाजी भागडे, सूर्यकांत शिवाजी जगदाळे, कृष्णात उत्तम जाधव आणि अक्षय शिवाजी भागडे यांचा समावेश होता. यातील चालक विशाल भगत गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोके, कान, छाती, पायाला गंभीर जखम झाली होती. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. तर इतर सहाजण जखमी झाले. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्रभर पावसात बचाव कार्य...

सातारा तालुका पोलिस रात्रभर अपघातस्थळी होते. पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमणे यांच्यासह कर्मचारी आणि रेस्क्यू पथकाने गुरूवारी रात्रीच्या सुमारासच बचाव कार्य सुरू केले. पथकातील सदस्य दोरीच्या सहायाने दरीत उतरुन जखमीपर्यंत पोहोचले. त्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. हे बचाव कार्य संपण्यास पहाटेचे साडे चार वाजले होते. पाऊस सुरू असतानाही हे बचाव कार्य पूर्ण करण्यात आले.

Web Title: Big accident in Satara, car falls in 500 feet gorge at Yavateshwar Ghat; death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.