धोमच्या डाव्या कालव्याला वाई तालुक्यातील पांडे येथे भगदाड 

By दीपक शिंदे | Published: December 16, 2023 10:58 AM2023-12-16T10:58:36+5:302023-12-16T11:00:11+5:30

दोन बैलांचा शोध सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आले आहे.

big hole at pande in wai taluka on the left canal of dhome | धोमच्या डाव्या कालव्याला वाई तालुक्यातील पांडे येथे भगदाड 

धोमच्या डाव्या कालव्याला वाई तालुक्यातील पांडे येथे भगदाड 

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यात झोपेत असलेल्या ऊसतोड मजुरांचा संसार वाहून गेला आहे. दोन बैलांचा शोध सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. ऊसतोड मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

सातारा जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने खटाव, माणसह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे. त्याच कालव्याला पांडे गावच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले. दिवसभर ऊस तोड करून झोपलेल्या ऊसतोड मुजरांच्या दीडशे झोपडयात पाणी शिरले. त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. दोन बैल बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: big hole at pande in wai taluka on the left canal of dhome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.