विक्रमसिंह पाटणकरांवर लोकांची मोठी प्रेमभावना : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:24 PM2018-12-25T23:24:24+5:302018-12-25T23:25:32+5:30
‘आपल्या उमेदीचा सर्वाधिक कालावधी तालुक्यातील डोंगरदऱ्यातील लोकांच्या हितासाठी दिला. त्यांच्या विकासाची खबरदारी घेतली, अशा विक्रमसिंह पाटणकर या नेत्यावरील प्रेमभावना इथल्या उपस्थित जनसमुदायातून जाणवत आहे.
पाटण : ‘आपल्या उमेदीचा सर्वाधिक कालावधी तालुक्यातील डोंगरदऱ्यातील लोकांच्या हितासाठी दिला. त्यांच्या विकासाची खबरदारी घेतली, अशा विक्रमसिंह पाटणकर या नेत्यावरील प्रेमभावना इथल्या उपस्थित जनसमुदायातून जाणवत आहे. आमदारकीच्या काळात ते कधीही माझ्याकडे मला मंत्री करा म्हणून आले नाहीत. ते तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आले,’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले.पाटण येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार भास्कर जाधव, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, राष्ट्रवादी काँगे्रस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, पाटण पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तेजस शिंदे, सुजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘विक्रमसिंह पाटणकर, पृथ्वीराज चव्हाण आणि मी एकाच व्यासपीठावर येण्याचे कारण शरद पवार हे आहेत. व्यासपीठावर आम्ही पंच्याहत्तरी गाठलेली मंडळी आहोत. आता येणाºया पिढीच्या हाती सत्ता द्यावी.
’ माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या कारकिर्दीत तालुक्यात रस्त्याचे जाळे विणले. डोंगरदºयातील लोकांना रस्त्यांच्या माध्यमातून तालुक्याला जोडले. जर विक्रमसिंह पाटणकर वाड्यात राहत असलेतरी ते नेहमी सर्वसामान्य व डोंगर पठारावर राहणाºया लोकांचा विचार करत असतात.’
सत्काराला उत्तर देताना विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘राजकारणात ५० वर्षे कशी झाली ती समजलीच नाहीत. पाटण तालुक्यातील जनतेला रस्ते, वीज, पाणी, रोजगार पाहिजे. ती स्वप्ने मला पूर्ण करण्याची संधी मिळाली, हे
माझे भाग्य आहे. तालुक्यातील जनतेने नेहमी शरद पवार यांच्यावर प्रेम केले. मी मात्र निमित्त ठरलो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करू शकलो.’ पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुभाष पवार यांनी सूत्रसंचालन तर राजेश पवार यांनी आभार मानले.
निवडणूक गोड होणार...
विक्रमसिंह पाटणकर यांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर लहानसा केक कापण्यात आला. हा केक कापल्यानंतर शरद पवार यांनी स्वत:च्या हाताने सर्व उपस्थितांसमोर विक्रमसिंह पाटणकर यांना भरविला. त्यामुळे २०१९ मधील निवडणूक पाटणकर गटाला गोड जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
पाटण येथे मंगळवारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी शरद पवार, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते.