राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

By दीपक शिंदे | Published: October 31, 2022 10:17 PM2022-10-31T22:17:50+5:302022-10-31T22:18:17+5:30

Eknath-Shinde : ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Big projects will come up in the state soon, Eknath Shinde assured | राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

Next

- दीपक शिंदे
सातारा - ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत बोलणी सुरु आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी त्यांनी महाबळेश्वर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते सायंकाळी मूळगावी पोहचले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील काही मोठे प्रकल्प बाहेर गेले यासाठी केवळ आमचे सरकार जबाबदार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे याबाबत मी फारसे बोलणार नाही. पण, लवकरच काही प्रकल्प राज्यात येतील. याठिकाणच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, तरुणांच्या हाताला काम देणे यासाठी आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामाने सर्व टीकांना उत्तरे देऊ. त्यांनी टीका करत राहायचे आणि आम्ही काम करत राहू असेही ते यावेळी म्हणाले.

अतिवृष्टीमुळे लोकांच्या हातात आलेले पीक वाया गेले आहे. याबाबत आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही निकष बदलून भरपूर मदत करण्याचे काम हे सरकार करत आहे. यापूर्वी कधीही एवढी मदत मिळाली नव्हती तेवढी मदत देण्याचे काम आम्ही करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम हे सरकार करत असून त्यांच्याबाबत आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या कामापासून मागे हटणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हेच लक्षात ठेवून आमचे काम सुरु आहे.

राज्यातील बळीराजा आणि जनता सुखी राहू दे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाजवळील उत्तरेश्वर या देवाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवाकडे काय मागणी केली असे विचारले असता देवाकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व कळते. तरीही या राज्यातील गोरगरीब जनता, बळीराजा सुखी राहू दे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण कायम येऊ देत अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Big projects will come up in the state soon, Eknath Shinde assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.