महाबळेश्वरमधील रक्तदान शिबिरात युवकांचा मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:10+5:302021-07-09T04:25:10+5:30

महाबळेश्वर दैनिक लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

Big response of youth in blood donation camp in Mahabaleshwar | महाबळेश्वरमधील रक्तदान शिबिरात युवकांचा मोठा प्रतिसाद

महाबळेश्वरमधील रक्तदान शिबिरात युवकांचा मोठा प्रतिसाद

Next

महाबळेश्वर

दैनिक लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७३ युवक-युवतींनी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिबिरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.

महाबळेश्वर येथे लोकमतने आयोजित रक्तदान शिबिरात लोकमतवर जिवापाड प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. शिबिराचे उद्घाटन महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, उद्योगपती रमेशशेठ पल्लोड व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर तसेच महाबळेश्वर नगरीचे उपनगराध्यक्ष अफझल सुतार व अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे, नगरसेवक संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, रवींद्र कुंभारदरे उपस्थित होते.

रक्तदानासाठी महाबळेश्वर महिन्द्रा क्लबचे व्यवस्थापक नितीन शिंदे व कर्मचारी, महाबळेश्वर वनविभाग कर्मचारी, महाबळेश्वर मराठी पत्रकार संघ अध्यक्ष अभिजित खुरासणे, विलास काळे, सचिन शिर्के, प्रेषित गांधी, अजित कुंभारदरे, वामनराव आवळे, ॲड. संजय जंगम, संदीप आखाडे, तौफिक पटवेकर, गणराज एन्टरप्रायजेस व पूजा इलेक्ट्रॉनिक्सचे राजूभाऊ भोसले, राकेश चव्हाण, रशिद शेख, आकाश कदम, सचिन सपकाळ, अक्षय ब्लड बँक साताराचे सतीश साळुंखे, लोकमत जाहिरात विभागाचे अनुप चौरसिया, लोकमतचे महाबळेश्वर प्रतिनिधी अजित जाधव उपस्थित होते.

चौकट

अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही केले मतदान

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार व नगरसेवक संदीप साळुंखे, महाबळेश्वर मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन शिर्के व ॲड. संजय जंगम यांनी रक्तदान केले.

Web Title: Big response of youth in blood donation camp in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.