मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:40 PM2018-02-18T23:40:10+5:302018-02-18T23:40:56+5:30

Big thief abroad; Farmer's inquiry stage: Pawar | मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार

मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार

Next


खंडाळा : ‘सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात देशात उल्लेखनीय काम केले आहे. शेतकºयांसाठी पारदर्शक काम करणाºया बँकेची चौकशी राज्य सरकार करते आहे. चोºया करणारे मोदी परदेशात मोकाट फिरतात. मात्र, दुष्काळात छावण्या उभारून पशुधन वाचविणारे चौकशीच्या फेºयात अडकतात,’ अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.
लोणंद येथे आयोजित शरद कृषी महोत्सव व प्रदर्शनात शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस पाच दशके पूर्ण झाल्याबद्दल आयोजित गौरवप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, सुभाषराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘सत्तेचा वापर शेवटच्या घटकातील माणसांसाठी अखंडपणे करायचा असतो, ही आमची शिकवण आहे. सरकारने खुशाल चौकशी करावी. आम्ही सर्वसामान्य माणसांशी बांधिलकी सोडणार नाही. सध्याचे राज्य सरकार चौकशीवर खूप प्रेम करणारे आहे. त्यामुळे हे सरकार कुणासाठी आलंय हेच कळत नाही.’
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘शरद पवार हे लोकांमध्ये जाऊन काम करणारे, शेतकºयांबद्दल कणव असणारे नेते आहेत. राज्यात शेतकºयांना रुचणारं राजकारण राहिलेलं नाही. शेतकºयांच्या अस्तित्वाचे प्रश्न तयार झाल्याने तो टिकवायचा असेल तर शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही.’

Web Title: Big thief abroad; Farmer's inquiry stage: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.