बिबटोबाच्या भीतीपायी चिमुकल्यांचे खेळ मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:22 AM2018-03-26T00:22:57+5:302018-03-26T00:22:57+5:30

सातारा : सोनगाव अन् शाहूपुरी परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर आता बिबट्याने आपला मोर्चा अजिंक्यताºयाकडे वळविला आहे. किल्ल्याजवळील महादेव मंदिर परिसरात रविवारी तिसºया दिवशीही बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीपोटी नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणे बंद केले आहे. दरम्यान, बिबटोबाच्या दहशतीखाली वावरणाºया माची पेठेतील चिमुकल्यांनीही रविवारी दिवसभर मंदिरातच खेळांचा आनंद लुटला.

Bimbabo's Fear of Chimukanya game in the temple | बिबटोबाच्या भीतीपायी चिमुकल्यांचे खेळ मंदिरात

बिबटोबाच्या भीतीपायी चिमुकल्यांचे खेळ मंदिरात

Next
ठळक मुद्देअजिंक्यताऱ्यावर मुक्काम : माची पेठेतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

सातारा : सोनगाव अन् शाहूपुरी परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर आता बिबट्याने आपला मोर्चा अजिंक्यताºयाकडे वळविला आहे. किल्ल्याजवळील महादेव मंदिर परिसरात रविवारी तिसºया दिवशीही बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीपोटी नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणे बंद केले आहे. दरम्यान, बिबटोबाच्या दहशतीखाली वावरणाºया माची पेठेतील चिमुकल्यांनीही रविवारी दिवसभर मंदिरातच खेळांचा आनंद लुटला.
अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेकदा बिबट्याच्या पाऊल खुणांची नोंद करण्यात आली आहे. पहाटे व सायंकाळी फिरण्यासाठी येणाºया नागरिकांना कित्येकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ल्यावर बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. अशा परिस्थितीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या माची पेठेत अनेक वसाहती आहेत. या वसाहतींमधील नागरिकांमध्ये बिबट्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी रात्री घरातून बाहेर पडणेही बंद केले आहे. रविवारी दिवसभर माचीपेठ, अजिंक्य कॉलनी परिसरात शुकशुकाट जाणवत होता. नागरिकांमध्ये केवळ बिबट्याचीच चर्चा सुरू होती. नेहमी अंगणात व मैदानात बागडणारी मुले मंदिरात खेळताना दिसून आली. बिबट्या नजरेस पडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता याची माहिती तातडीने वन विभागास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मॉर्निंग वॉककडे अनेकांची पाठ
अजिंक्यताºयावर मॉर्निंग वॉकसाठी येणाºया नागरिकांची संख्या मोठी आहे. भल्या पहाटे किल्ल्यावर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळते. मात्र, बिबट्याच्या धास्तीमुळे नागरिकांचे मॉर्निंग वॉकला येण्याचे प्रमाणही गेल्या दोन दिवसांत कमी झाले आहे.

Web Title: Bimbabo's Fear of Chimukanya game in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.