सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बनलाय पक्षीमय । प्रकल्पात २५४ प्रजातींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:17 PM2019-03-02T23:17:54+5:302019-03-02T23:18:14+5:30

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी पट्टेरी वाघ कॅमेराबद्ध झाला. ‘वाघोबा’च्या त्या ‘क्लिक’ने पर्यावरणप्रेमी सुखावले खरे; पण गत तीन वर्षांपासून काही पक्षीप्रेमी प्रकल्पातील पाखरांच्या मागे धावतातय.

The bird-borne Sahyadri Tiger Reserve The project records 254 species | सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बनलाय पक्षीमय । प्रकल्पात २५४ प्रजातींची नोंद

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बनलाय पक्षीमय । प्रकल्पात २५४ प्रजातींची नोंद

Next
ठळक मुद्देजागतिक वन्यजीव दिन -निरीक्षकांचा अहवाल

संजय पाटील ।
कºहाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी पट्टेरी वाघ कॅमेराबद्ध झाला. ‘वाघोबा’च्या त्या ‘क्लिक’ने पर्यावरणप्रेमी सुखावले खरे; पण गत तीन वर्षांपासून काही पक्षीप्रेमी प्रकल्पातील पाखरांच्या मागे धावतातय. प्रकल्पातील पक्ष्यांचा अभ्यास त्यांनी सुरू केलाय. या अभ्यासातूनच त्यांनी त्यांचे स्वत:चे काही निष्कर्ष वन्यजीव विभागासमोर मांडलेत.

पश्चिम घाटात आत्तापर्यंत ५०० प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी २५४ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे मत आहे. त्यासाठी सलग तीन वर्षे त्यांनी अभ्यास केला आहे. अभ्यासाअंती तयार झालेला पक्षी निरीक्षणाचा अहवालही त्यांनी वन्यजीव विभागाला सादर केला आहे. निळ्या पंखाच्या पोपटासारख्या (ब्लू विंगड पाराकीत) काही जाती प्रकल्पात आहेत. त्या जाती जगात फक्त पश्चिम घाटातच आढळतात.

जगात फक्त पश्चिम घाटातच पक्ष्यांच्या २८ प्रजाती नोंदल्या गेल्या आहेत. त्या प्रजातींपैकी १३ जातींच्या पक्ष्यांची नोंदही सह्याद्री प्रकल्पातच झालेली आहे. येथील समृद्ध पक्षीजीवन पाहता भारतीय पक्षी संवर्धन संस्था व बीएनएचएस या भारतातील प्रमुख संस्थांनी कोयना व चांदोली या जंगल क्षेत्राला जगातील महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.सह्याद्री प्रकल्पात कीटक भक्षी, मांस भक्षी, फुलातील रस पिणारे, फळ खाणारे, शिकारी, दाणे-बिया खाणारे, मासे खाणारे असे विविध प्रकारचे पक्षी आहेत.

सह्याद्री प्रकल्पातील पक्षी
जगात फक्त पश्चिम घाटातच काही पक्षी आढळतात. त्यापैकीही नीलगिरी वृक्ष कबुतर, मलबारी पोपट, मलबारी चंडोल, राखी डोक्याचा बुलबुल, तांबूस सातभाई, पांढऱ्या पोटाचा नाचरा, नीलगिरी फुल्तोचा, छोटा शिंजीर, किरमिजी शिंजीर, मलबारी धनेश, करड्या छातीचा हरेल, मलबारी मैना हे पक्षी सह्याद्री प्रकल्पात नोंदले गेलेत.


नोंदली निरीक्षणे
राम नदी निरीक्षण मनोरा
झोळंबी येथील कारंबली
नवजा-ओझर्डे परिसर
रामबाण परिसर
नेचल दत्त धाम परिसर
गाढवखोप ते बाजे परिसर
वाल्मिकी मंदिर परिसर
मोरगिरी धरण परिसर


 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राणी आणि पक्षी जीवन समृद्ध आहे. प्रकल्पात भटकंती केल्यानंतर वेगवेगळ्या प्रजातीचे हजारो पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. या पक्ष्यांची नोंद व्हावी, या हेतूनेच मी निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि या निरीक्षणाअंती हाती आलेला अहवाल वन्यजीव विभागाला सादर केला आहे.
- रोहण भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Web Title: The bird-borne Sahyadri Tiger Reserve The project records 254 species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.