कचऱ्यावर उपजीविका पक्ष्यांची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:22+5:302021-01-18T04:35:22+5:30

सातारा शहरातील सोनगाव कचरा डेपोत पालिकेच्या घंटागाडी कचरा आणून टाकत असतात. त्याच्यावरच पक्ष्यांची उपजीविका सुरू आहे. त्यातच जैव वैद्यकीय ...

Birds subsist on waste ... | कचऱ्यावर उपजीविका पक्ष्यांची...

कचऱ्यावर उपजीविका पक्ष्यांची...

Next

सातारा शहरातील सोनगाव कचरा डेपोत पालिकेच्या घंटागाडी कचरा आणून टाकत असतात. त्याच्यावरच पक्ष्यांची उपजीविका सुरू आहे. त्यातच जैव वैद्यकीय कचराही टाकला जात असल्याने तो घातक ठरू शकतो. (छाया : जावेद खान) (१४जावेद१६)

-------------------------------

उन्हाची तीव्रता वाढली

सातारा : सातारा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सरासरी होळीपर्यंत थंडी असते. यंदा मात्र ती लवकरच गायब झाली आहे.

---------------

रस्त्याचे काम संथ

सातारा : सातारा-विटा रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. रस्त्याच्या बाजूलाच खडी पडलेली आहे. काही ठिकाणी रस्ते उखडून ठेवले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांचे तर प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

---------------------

विनामास्क वावर

रहीमतपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी धोका कमी झालेला नाही, त्यामुळे गर्दीत जाणे टाळा, मास्क लावा व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही अनेक लोक बिनधास्तपणे मास्कचा वापर न करता बाजारपेठेतून वावरत आहेत.

-----------------------

यात्रेतील कार्यक्रम रद्द

वाई : वाई तालुक्यातील प्रसिद्ध मांढरगडावरील काळूबाई देवीची यात्रा काही दिवसांवर आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यात्रेतील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिराकडे जाण्यास बंदी आहे.

--------------

पाण्याचा अपव्यय

सातारा : सातारा शहरात विविध योजनांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शेवटपर्यंत पाणी पुरावे म्हणून पाण्याची बचत करावी लागते; पण सातारकर ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. अनेक ठिकाणी नळांना तोट्याच नसल्याने पाणी वाहून जात आहे.

-------------------------

बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सातारा : भारत विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिनानिमित्ताने रविवार, दि. १७ पासून गुरुवार, दि. २१ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दहा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, मुलींना लोहयुक्त आहार व त्यांच्या कुटुंबियांस लोखंडी कढई भेट देण्यात येणार आहे.

------------------------------

फांद्या छाटल्या

सातारा : सातारा शहरातील अनेक भागांत वसाहती उभारण्याचे काम सुरू आहे. इमारतीच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या विनापरवाना छाटल्या जात आहेत. काेणाला काही कळण्याच्या आतच पांद्या गायब केल्या जातात. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

----------------------ऑनलाइन प्रयोग

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. या काळात मुले घरात बसूनच आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन शिकविले जाते. काही भागातील शिक्षक ऑनलाइन शिकविताना विविध प्रयोग करीत आहेत. त्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत आहे.

-----------------------

हातपंप धूळखात पडून

सातारा : जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. त्यावेळी हातपंप उपयोगी पडतात. मात्र, अनेक ठिकाणचे हातपंप गंजले असून, ते धूळखात पडून आहेत. हातपंपांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

--------------------------पाणपोईची गरज

दहीवडी : माण तालुक्यात मार्चपासून पाणीटंचाई जाणवते. ग्रामीण भागातून नागरिक दररोज मोठ्या संख्येने दहीवडीत येतात. त्यामुळे या शहरांमध्ये सामाजिक संघटनांकडून पाणपोई सुरू केली जाते. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

---------------------बसस्थानकात रिक्षा

सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात रिक्षाचालक विनाकारण जाऊन प्रवाशांना त्रास देत आहेत. वास्तविक बसस्थानकात कोणत्याही खासगी प्रवासी वाहनांना परवानगी नसताना रिक्षा जातात. अचानक वळण घेत असल्याने अपघाताचा धोका आहे.

-----------------

संरक्षक जाळी व्यावसायिकांकडून गायब

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी, पादचारी, जनावरे अचानक महामार्गावर येऊ नये म्हणून संरक्षक जाळी बसविली जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होते. मात्र, शिरवळसह अनेक भागांत महामार्गाच्या कडेलाच वडापाव, चहाची हॉटेल्स आहेत. या हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहक यावेत यासाठी परस्पर संरक्षक जाळी काढली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

-------------------गटारींची सफाई होईना

करंजे : करंजे परिसरातील अनेक भागांत बंदिस्त गटारी आहेत. त्यांची स्वच्छता गेल्या दोन वर्षांपासून नियमित स्वरूपात केली जात नाही. त्यामुळे पाणी तुंबून दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

-----------------------

सोनुले यांची निवड

कुडाळ : जावळी तालुका कास्ट्राईब संघटनेच्या अध्यक्षपदी रणजित सोनुले यांची निवड करण्यात आली. सातारा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष प्रशांत मोरे होते. यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले.

----------------------------

ग्रामपंचायत निवडणूक निकालाची प्रतीक्षा

सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. प्रत्येक गावात आपल्याच विचाराची सत्ता यावी, म्हणून कार्यकर्ते काही दिवसांपासून जीव तोडून काम करीत होते. येथे शांततेत मतदान झाले. सोमवार, दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे. यामध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक ठिकाणी पैजाही लावल्या जात आहेत.

------------------------

१४जावेद१७

सोनगाव कचरा डेपो ‘ओव्हर फ्लो’...

सातारा शहरातून जमा होणारा कचरा सातारा पालिका घंटागाडीतून जमा करून तो सोनगाव कचरा डेपोत टाकत आहे; पण सोनगाव कचरा डेपोतही तो भरून वाहत आहे. मुख्य गेटच्या बाहेर कचरा आला आहे. (छाया : जावेद खान)

-------------------------

Web Title: Birds subsist on waste ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.