माणमध्ये भाजप १८, तर राष्ट्रवादीची १९ ग्रामपंचायतींत सत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:43+5:302021-01-19T04:40:43+5:30

दहिवडी : माण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून भाजपने ४७ पैकी १८, तर राष्ट्रवादीने १९ गावांत सत्ता मिळवली. ...

BJP 18 in Man, NCP in 19 Gram Panchayats! | माणमध्ये भाजप १८, तर राष्ट्रवादीची १९ ग्रामपंचायतींत सत्ता!

माणमध्ये भाजप १८, तर राष्ट्रवादीची १९ ग्रामपंचायतींत सत्ता!

Next

दहिवडी : माण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून भाजपने ४७ पैकी १८, तर राष्ट्रवादीने १९ गावांत सत्ता मिळवली. शिवसेनेने बोथेत सत्ता कायम राखली. तर राष्ट्रवादी-भाजप युतीला तीन, राष्ट्रवादी-रासप युतीलाही तीन आणि भाजप-रासप व शिवसेना-राष्ट्रवादी युतीला प्रत्येकी एका ठिकाणी सत्ता मिळाली. देवापूर, राणंद, शिंगणापूर, पिंगळी, शिरवली, कुळकजाई, पर्यंती आणि वाघमोडेवाडीत सत्तांतर झाले आहे.

माण तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. तर सोमवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये आ. जयकुमार गोरे यांनी राणंद, शिंगणापूर, पर्यंत, वाघमोडेवाडी, पिंगळी खुर्द, कुळकजाई या ग्रामपंचायती नव्याने खेचून आणल्या आहेत. वाघमोडेवाडीत राष्ट्रवादीचे नेते दादा मडके यांना धक्का बसला असून या ठिकाणी भाजपने ७ पैकी ४ जागा जिंकून सत्ता खेचून आणली. पर्यंतीमध्येही राष्ट्रवादीचे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्याकडून भाजपने सत्ता काढून घेतली. रांणदमध्ये राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन भाजपने सत्ता मिळवली. तर हस्तनपूर, श्रीपालवण, धामणी, पिंपरी, ढाकणी, शंभूखेड, ढाकणी, कारखेल, बोडके, हिंगणी, वळई, सोकासन आपल्याकडे राखले आहे.

राष्ट्रवादीने शिंदी बुद्रुक, पिंगळी बुद्रुक, पानवण, गोंदवले खुर्द, डंगिरेवाडी, दिवडीत सत्ता मिळवली. गोंदवले बुद्रुक येथे काँग्रेसचे स्थानिक नेते बाळासाहेब माने यांनी सत्ता अबाधित राखली. राष्ट्रवादीच्या मदतीने वर्चस्व मिळवले आहे. देवापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली. तर वडजल येथे अनिल देसाई यांचा गट व राष्ट्रवादी युतीने बाजी मारली. भांडवली, किरकसाल, कुकडवाड येथेही राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. कुकुडवाडात राष्ट्रवादीचे संजय जाधव, किरकसालमध्ये आमोल काटकर, भांडवलीत सुनील सूर्यवंशी यांनी बाजी मारली.

तालुक्यातील शेनवडी, काळचौंडी, वडगावमध्ये राष्ट्रवादी व भाजप या दोघांनी युती करून सत्ता मिळवली. तर रासप व राष्ट्रवादी युतीने रांजणी, वरकुटे म्हसवड, पळसावडे या ग्रामपंचायती मिळवल्या आहेत. तर येळेवाडीत रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर यांनी भाजपच्या मदतीने सत्ता आणली. जांभुळणीत शिवसेना व राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. तर शेवरी येथे शेखर गोरे, जयकुमार गोरे यांच्या गटाच्या एकत्रित पॅनलला ९ पैकी ४ जागा आणि अ‍ॅड. हिरवे यांच्या पॅनललाही ४ जागा मिळाल्या. तर एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे.

चौकट :

भाजपला मिळालेल्या ग्रामपंचायती...

पिंगळी खुर्द, हस्तनपूर, श्रीपालवण, धामणी, राणंद, शिंगणापूर, कुळकजाई, वारुगड, पिंपरी, शंभूखेड, ढाकणी, कारखेल, वाघमोडेवाडी, बोडके, पर्यंती, हिंगणी, वळई आणि सोकासन.

राष्ट्रवादीने सत्ता मिळविलेल्या ग्रामपंचायती...

शिंदी बुद्रुक, पिंगळी बुद्रुक, पानवण, गोंदवले बुद्रुक, किरकसाल, शिरवली, गोंदवले खुर्द, भांडवली, कुकुडवाड, भालवडी, दिवडी, देवापूर डंगिरेवाडी आणि वडजल.

राष्ट्रवादी-भाजप युती : शेनवडी, काळचौंडी, वडगाव.

राष्ट्रवादी-रासप युती : पळसावडे, वरकुटे-म्हसवड, रांजणी.

रासप-भाजप युती : येळेवाडी.

शिवसेना-राष्ट्रवादी युती : जांभुळणी

- शिवसेना : बोथे.

- संमिश्र : शेवरी.

Web Title: BJP 18 in Man, NCP in 19 Gram Panchayats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.