भाजप अन् राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन विधानसभा मतदार संघावरच गणित! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:02 PM2019-04-18T13:02:51+5:302019-04-18T13:04:02+5:30

माढा मतदार संघातील प्रचार शिगेला पोहोचला असून, प्रमुख दोन उमेदवारांची विजयाची गणिते ही प्रत्येकी तीन विधानसभा मतदार संघावर आहेत. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माण, फलटण आणि माळशिरसमधून तर संजय शिंदे हे माढा, करमाळा आणि सांगोल्यावर खºया अर्थाने भिस्त ठेवून आहेत.      

BJP and NCP every three Assembly constituencies! | भाजप अन् राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन विधानसभा मतदार संघावरच गणित! 

भाजप अन् राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन विधानसभा मतदार संघावरच गणित! 

googlenewsNext
ठळक मुद्देमाढा मतदारसंघ; संजयमामा माढा, करमाळा तर रणजितसिंह माण, फलटणवर निर्भर 

नितीन काळेल । 

सातारा : माढा मतदार संघातील प्रचार शिगेला पोहोचला असून, प्रमुख दोन उमेदवारांची विजयाची गणिते ही प्रत्येकी तीन विधानसभा मतदार संघावर आहेत. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माण, फलटण आणि माळशिरसमधून तर संजय शिंदे हे माढा, करमाळा आणि सांगोल्यावर खºया अर्थाने भिस्त ठेवून आहेत.      

रणजितसिंह हे फलटणचे. त्यांच्यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा. स्थानिक उमेदवार म्हणून ते मतदारांशी संपर्क साधत आहेत. या मतदार संघात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण ठाण मांडून आहेत. माण-खटाव मतदार संघात भाजपच्या बरोबरीला शिवसेना व आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले शेखर गोरे यांची ताकद आहे; पण आमदार गोरे रणजितसिंहांबरोबर असले तरी दोन्ही तालुक्यांचे काँग्रेसचे अध्यक्ष शिंदे यांच्या प्रचारात आहेत. त्यामुळे रणजितसिंहांना माण-खटावमधून मोठे मताधिक्य मिळवून देणे आमदार गोरेंसाठी कसोटी ठरलीय. तर राष्ट्रवादी सध्यातरी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यासह गटागटातील नेत्यांवर विसंबून आहे. 

माळशिरस मतदारसंघ हा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा. या मतदारसंघात त्यांची ताकद आहे. त्यातच मोहिते विरोधक उत्तमराव जानकर हेही भाजपसोबत आहेत. येथून अधिकाधिक भाजपला मताधिक्य कसे राहील, यावर पक्षाचा प्रयत्न आहे. 

माढा विधानसभा हा संजय शिंदे यांचा घरचा मतदारसंघ. त्यांचे बंधू बबनराव शिंदे हे आमदार. त्यातच स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना मतदार जवळ करतील; पण या मतदार संघातून मागील विधानसभा निवडणूक लढविणारे काँग्रेसचे कल्याण काळे यांनी कमळ हातात घेतलंय. त्यांच्या गटाची ताकद दुर्लक्षित करता येत नाही. करमाळा मतदार संघातून संजय शिंदे यांनी २०१४ ची निवडणूक लढविलेली. त्यावेळी निसटता पराभव झालेला. आता करमाळ्यातून बागल गटाचीही ताकद शिंदे यांच्या पाठीशी राहणार आहे. बागल गटाला संजयमामा खासदार होणे आवडणार आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत संजयमामा उतरणार नाहीत, हेच बागल गटाला अपेक्षित आहे. आमदार नारायण पाटील भाजपबरोबर आहेत.   

सांगोल्याचे आमदार शेकापचे गणपतराव देशमुख आहेत. तर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे असून तेही सांगोल्याचे आहेत. या दोघांवर राष्ट्रवादीची भिस्त आहे. तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर भाजप अवलंबून आहे. आमदार देशमुख आणि साळुंखे यांच्यावरच संजयमामांचे पारडे ठरणार आहे. देशमुख हे मदत करतील; पण विधान परिषद निवडणुकीत संजयमामांमुळे दीपक साळुंखे यांचा पराभव झाला होता. हे शल्य साळुंखे यांना असणारच आहे.  

मागीलवेळी तीन-तीन विधानसभा मतदार संघावरच चित्र... 

२०१४ ची लोकसभा निवडणूक चुरशीची झाली. त्या निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना माळशिरस, माढा आणि माण या विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळाले. सदाभाऊ खोत यांना सांगोला, फलटण आणि करमाळ्यामधून मताधिक्य मिळाले होते. सदाभाऊ हे मतदार संघातील नसतानाही मोहिते-पाटील यांना विजयासाठी झुंजविले होते. त्यामुळे माढ्याच्या तिढ्यातून कोण विजयी पताका उभारणार? हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

Web Title: BJP and NCP every three Assembly constituencies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.