‘भाजप’ने पाठीत खंजीर खुपसला--गजानन किर्तीकर :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:52 PM2017-10-09T22:52:09+5:302017-10-09T22:55:32+5:30

वाई : ‘देशातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारभाराला कंटाळली होती.

 'BJP' backed by Khanjir Khopsa - Gajanan Kirtikar: | ‘भाजप’ने पाठीत खंजीर खुपसला--गजानन किर्तीकर :

‘भाजप’ने पाठीत खंजीर खुपसला--गजानन किर्तीकर :

Next
ठळक मुद्देवाई येथील जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात टीकास्त्र०१९ च्या विधानसभेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.’

लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : ‘देशातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारभाराला कंटाळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणबाजीला भुलून बळी पडून जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला. शिवसेनेने पंचवीस वर्षे मैत्रीचे नाते टिकवून ठेवल्यानेच भाजपला सत्तेत येता आले. सत्तेत येताच ‘भाजप’ने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप केले आहे,’ अशी टीका शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी केली.
वाई येथे सोमवारी आयोजित शिवसेनेच्या जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील,आमदार शंभूराज देसाई, युगंधरा साळेकर, राजेश कुंभारदरे, चंद्रकांत जाधव, हर्शल कदम, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शारदाताई जाधव, अजित यादव, हरिदास जगदाळे, अनिल शेंडे, यशवंत घाडगे, रणजितसिंह भोसले, महेश शिंदे, किरण खामकर, गणेश जाधव, योगेश चंद्रस, विवेक भोसले उपस्थित होते.
किर्तीकर म्हणाले, ‘जनतेचा भाजप सरकारविषयी भ्रमनिरास झाला आहे. मोदी सरकारने काळ्या पैशाच्या विरोधात केलेली नोटबंदी, जीएसटी कर प्रणाली हे दोन्ही निर्णय भाजपच्या अंगलट आले आहेत. यामुळे देशात महागाई वाढली. सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशात भाजपविरोधी लाट असून, शिवसेनेने या ‘भाजप’विरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी संघटन मजबूत करण्याची गरज आहे. २०१९ च्या विधानसभेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.’
संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘कुठे आहेत ते अच्छे दिन. महाराष्ट्रातील जनतेचे अच्छे दिनाचे स्वप्न स्वप्नच राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतील ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारी शिवसेना ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. शेतकºयांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत असतानाही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल.’
विजय शिवतारे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात पाणी सिंचनाचे जलसंधारणाचे काम हे शिवसेनेनेच केले आहेत. १९९५ मध्ये युतीचे शासन असताना कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून शिवसेनेने जलसंधारणाचे शंभर टक्के प्रश्न मार्गी लावले. शिवसेनेच्या कामाचे श्रेय येथील प्रस्थापित पक्षनेते घेत आहेत.’
आमदार शंभूराज देसाई यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांची संपर्क नेतेपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वाई, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, कोरेगाव, खंडाळा, जावळी, खटाव, फलटण तालुक्यांतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


मोदी नवसाचं बाळ
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नवसाचे बाळ असून, त्याचे लाड पुरविता-पुरविता भाजपला नाकीनऊ आले आहे. लाडाच्या हट्टापायी भाजपला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

Web Title:  'BJP' backed by Khanjir Khopsa - Gajanan Kirtikar:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.