कलाक्षेत्राच्या मागण्यांसाठी भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:02 AM2021-01-08T06:02:47+5:302021-01-08T06:02:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लाखो कलावंतांचे पोट ज्यावर अवलंबून आहे, अशा सांस्कृतिक क्षेत्रातील विविध बाबींवर कोरोना परिस्थितीत ...

BJP for the demands of the arts | कलाक्षेत्राच्या मागण्यांसाठी भाजप

कलाक्षेत्राच्या मागण्यांसाठी भाजप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : लाखो कलावंतांचे पोट ज्यावर अवलंबून आहे, अशा सांस्कृतिक क्षेत्रातील विविध बाबींवर कोरोना परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ५ जानेवारी रोजी भाजपच्या सांस्कृतिक सेलच्यावतीने निवेदन देण्यात आले.

सांस्कृतिक सेलचे प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी, संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे, सहसंयोजक पंकज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने राज्यपालांना राजभवन इथे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रतिनिधी मंडळात उमेश घनसाळी, अभिनेते योगेश सोमण, लीना भागवत, राहुल वैद्य, संजय भाकरे, कुणाल गडेकर, व्यंकटेश बिदनूर आदी मान्यवर होते.

मराठी चित्रपटांचे थकीत अनुदान वितरित करावे, व्यावसायिक नाट्यसंस्था, नाट्य कलावंतांना मदत द्यावी, कोरोनासंदर्भातील नियमावलीअंतर्गत अर्ध्या आसन क्षमतेने प्रेक्षक नाट्यगृहात बसू शकतो. या पार्श्वभूमीवर नाट्य निर्मात्यांचा व पर्यायाने नाट्य कलावंतांचा खर्च निघणेही अवघड आहे. यामुळे हजारो कलावंतांच्या जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना स्थिती पूर्ववत होईपर्यंत संस्थांना व कलावंतांना अनुदान द्यावे; शिवाय जर आसनक्षमता अर्धी असेल, तर नाट्यगृहांचे भाडे अर्धे केले पाहिजे. यासंदर्भात राज्यातील शासकीय व ख‍ासगी नाट्यगृह चालकांसाठी सूचनापत्र काढावे, असेही निवेदनात म्हटले आहे. इतर मागण्यांमध्ये लोककला व कलावंतांची व्याख्या व्यापक करून त्यांना मदत करावी, वयोवृद्ध कलावंतांचे थकीत मानधन त्वरित वितरित करावे आणि यंदाच्या नवीन कलावंत निवडीची प्रक्रिया पार पाडावी व मानधन रकमेत वाढ करावी, राज्यनाट्य स्पर्धेच्या धर्तीवर राज्यनृत्य व राज्यचित्र स्पर्धा आयोजित कराव्यात, प्रत्येक जिल्हास्थानी स्वतंत्र सांस्कृतिक विभाग स्थापन करावा, विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्याचे गुणांकन मिळावे.

या बाबींचा सकारात्मक विचार करून त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात आपण राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

फोटो आहे....

Web Title: BJP for the demands of the arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.