संतोष जाधव यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे : फडणवीस

By admin | Published: October 9, 2016 12:23 AM2016-10-09T00:23:29+5:302016-10-09T00:23:29+5:30

सातारा-कोरेगाव मतदार संघातील प्रस्थापितांना चारीमुंड्या चित करून आजही युवकांचा आयडॉल म्हणून परिचित

BJP is firmly behind Santosh Jadhav: Fadnavis | संतोष जाधव यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे : फडणवीस

संतोष जाधव यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे : फडणवीस

Next

सातारा : ‘सातारा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघ ताब्यात घ्या, त्यानंतरच मी पेढे स्वीकारीन,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, निवडणुकांसाठी लागेल ती रसद, ताकद भाजपाकडून दिली जाईल, असे सांगून अत्यंत संघर्षातून राजकारणात टिकून राहिलेल्या संतोष जाधव यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गिरीश बापट, माजी मंत्री एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, कांताताई नलवडे, अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ सातारा-कोरेगाव मतदार संघातील प्रस्थापितांना चारीमुंड्या चित करून आजही युवकांचा आयडॉल म्हणून परिचित असणाऱ्या संतोष जाधव यांनी सातारा नगरपालिका, सातारा पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघ आपल्या ताब्यात घ्यावेत, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. भाजपाला आक्रमक चेहऱ्याची गरज होती. आज ती जाधव यांच्या रूपाने पूर्ण झाली. (प्रतिनिधी)

Web Title: BJP is firmly behind Santosh Jadhav: Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.