Udayanraje Bhosale : "कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच...", उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 09:50 AM2024-06-22T09:50:40+5:302024-06-22T09:51:58+5:30

Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात कोण फिरतो आणि कोण टीकाटिप्पणी करतो, याला मी महत्त्व देत नाही. माझ्यादृष्टीने ती मंडळी चिंगळी- पिंगळी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली.

bjp mp udayanraje bhosale says satara district politics will run by me and shivendra raje bhosale at koregaon satara | Udayanraje Bhosale : "कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच...", उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड! 

Udayanraje Bhosale : "कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच...", उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड! 

कोरेगाव : सातारा लोकसभा निवडणुकीने सर्वांना दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यात कोण म्हणतो म्हणून नेतृत्व करतो का, मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच या जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. म्हणताय तर दंड थोपटतोच, असे म्हणत दंड थोपटून खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील आगामी राजकीय वाटचालीचा संदेश सर्वसामान्य जनतेला दिला. यावेळी चिंगळी- पिंगळी असे म्हणत त्यांनी विरोधकांवर थेट टीकास्त्र सोडले.

कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या जितराज मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी ३ वा. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यातील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शा‍ब्दिक फटकेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

कोणीही किती शड्डू ठोका. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले.  सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करून विजयी केले आहे. या विजयाबद्दल लोकशाहीतील तुम्हा राजे मंडळींचा मी ऋणी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावणार आहे, असा निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. 

सातारा जिल्ह्यात कोण फिरतो आणि कोण टीकाटिप्पणी करतो, याला मी महत्त्व देत नाही. माझ्यादृष्टीने ती मंडळी चिंगळी- पिंगळी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. व्यासपीठावर सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठांच्या आठवणींना उजाळा
उदयनराजे भोसले यांचा पहिलाच आभार दौरा असल्याने त्यांनी जोशपूर्ण भाषण केले. विरोधकांवर टीका करत असताना त्यांनी आपले पिताश्री प्रतापसिंह महाराज भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सातारा जिल्ह्यात अभयसिंहराजे भोसले, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ, शंकरराव जगताप, डॉ. शालिनीताई पाटील, पी. डी. पाटील साहेब, विलासराव पाटील -उंडाळकर व विक्रमसिंह पाटणकर यांचा आदराने उल्लेख करत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्यांचे सान्निध्य लाभले असल्याचे सांगत नगरसेवक पदापासून सुरू झालेली कारकीर्द ते खासदार पदापर्यंतचा खडतर प्रवास त्यांनी उलगडला.

Web Title: bjp mp udayanraje bhosale says satara district politics will run by me and shivendra raje bhosale at koregaon satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.