ओबीसी आरक्षणासंदर्भात कऱ्हाडात भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:08+5:302021-09-16T04:48:08+5:30
कऱ्हाड : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसंदर्भात बुधवारी कऱ्हाडात भाजपच्यावतीने निदर्शने करण्यात आली. ओबीसी आरक्षण ...
कऱ्हाड : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसंदर्भात बुधवारी कऱ्हाडात भाजपच्यावतीने निदर्शने करण्यात आली. ओबीसी आरक्षण न देताच काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्याचा घाट घातला आहे. त्याचा आंदोलकांनी खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
बुधवारी सकाळी येथील दत्त चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली. ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुनील राठोड, सुनील शिंदे, प्रमोद शिंदे, सुदर्शन पाटसकर, मानसिंग कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, याबाबतच्या मागणीचे निवेदन आंदोलक कार्यकर्त्यांनी तहसीलदार देवकर यांच्याकडे सुपूर्द केले.
फोटो १५कऱ्हाड
कऱ्हाड येथे ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. (छाया : अरमान मुल्ला)
बातमी हॅलो 1 साठी वापरावी