लाचखोर नगराध्यक्षांना भाजप घालतंय पाठीशी
By admin | Published: June 19, 2017 12:49 AM2017-06-19T00:49:25+5:302017-06-19T00:49:25+5:30
अनिल सावंत : वाईत नगराध्यक्ष व त्यांच्या पतीच्या मनमानी कारभारामुळे शहराचा विकास खुंटला
वाई : राज्यात भाजपाची सत्ता असताना देखील भाजपच्या नगराध्यक्षांवर लाचखोर केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे धाडस केले; परंतु स्वच्छ कारभाराचा दिडोंरा पिठाणाऱ्या भाजपाच्या शासनाने भष्ट, लाचखोर नगराध्यक्षांना पाठीशी घालून नागरिकांचा भ्रमनिराश केला आहे. जोपर्यंत भ्रष्ट नगराध्यक्षा आपल्या पदाचा राजीनामा देणार तोपर्यंत राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडी आंदोलन सुरूच ठेवणार आहे़ तरी काळीमा फासणाऱ्या नगराध्यक्षांनी त्वरित राजीमाना द्यावा,’ असे उद्गार उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी काढले
वाई येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तीर्थक्षेत्र आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अॅड़ श्रीकांत चव्हाण, प्रदीप चोरगे, चरण गायकवाड, राजेश गुरव, दीपक ओसवाल, भारत खामकर, संग्राम पवार, शीतल शिंदे, प्रियांका डोंगरे, रेश्मा जायगुडे, आरती कांबळे, प्रदीप जायगुडे, संदीप डोंगरे, अजित शिंदे, गौरव कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़
उपनगराध्यक्ष सावंत म्हणाले, ‘वाईकरांनी सुशिक्षित उमेवार म्हणून वाई शहराच्या व्यापक विकासाचा दृष्टिकोन ठेवून डॉ़ प्रतिभा शिंदे यांना नगराध्ययक्ष म्हणून निवडून दिले़ आम्ही ही तीर्थक्षेत्र आघाडीचे बहुमत असताना केवळ शहराच्या विकासासाठी त्यांना वेळीवेळी सहकार्याची भूमिका ठेवली़; परंतु त्यांनी सदैव अहमपणा बाळगून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रश्नाविषयी दुजाभाव केला़ राज्यात व देशात भाजपचे शासन असून, कोणत्याही प्रकारचा विकासाचा मोठा प्रस्ताव शासनाकडे मांडला नाही़ उलट नगराध्यक्षांचा पद्भार स्वीकारल्यापासून जुनी प्रलंबित बिले काढण्यातच जास्त रस असल्याचे जाणवत होते़ त्याचे गुपितं या कारवाईने उघड झाले आहे़ नगराध्यक्ष त्यांच्या बगलबच्यांच्या विचाराने विरोधी नगसवेकांच्या प्रश्नांना नेहमी डावलण्याचे पाप त्यांनी केले असून नगराध्यक्षांनी त्वरित राजीनामा द्यावा.’
माजी नगराध्यक्ष अॅड़ चव्हाण म्हणाले, ‘मी सुद्धा जनतेतूनच निवडून आलो होतो़ त्यावेळी ही पालिकेत अशीच राजकीय परिस्थिती होती़ परंतु सध्याच चित्र खूप विचित्र असून, नगराध्यक्षांच्या आडमूठ भुमिकेमुळे वाई शहराचे मोठे नुकसान होणार आहे. वाईकरांना एका मताची किंमत मोजावी लागली आहे. कायद्याच्या कलम ४२ नुसार लोकनियुक्त नगराध्यक्षांनी पालिकेचा अवमान करणारे लज्जास्पद कृत्य केल्याने त्यांचे पद रद्द करण्याविषयी मतदार नागरिक मागणी करू शकतात़
आमचा लढा राजीनामा देण्यापर्यंत...
नगराध्यक्षांनी पालिकेत कमिशन राज चालवून पालिकेच्या पंरपरेला काळीमा फासला आहे़ वाईच्या विकासाला खीळ घालणाऱ्या नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याशिवाय तीर्थक्षेत्र आघाडी व वाईकर नागरिक नगराध्यक्ष विरोधी आंदोलन करणार असून, वाईकर नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून मुख्यमंत्र्यांना देणार आहेत़ पालिकेसमोर मुंडन आंदोलन, वाई बंद, नगराध्यक्षांच्या घरावर महिलांचा मोर्चा आदी आंदोलनांचे हत्यार उपसणार आहे़