भाजपचा कोरोनाग्रस्त साहाय्यता समिती टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:19+5:302021-04-24T04:40:19+5:30

सातारा : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यामध्ये टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील अकरा ...

BJP's Coronation Support Committee Task Force | भाजपचा कोरोनाग्रस्त साहाय्यता समिती टास्क फोर्स

भाजपचा कोरोनाग्रस्त साहाय्यता समिती टास्क फोर्स

googlenewsNext

सातारा : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यामध्ये टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांसाठी पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी अविरत कार्यरत आहेत. कोरोनाग्रस्तांना कशाप्रकारे मदत करता येईल हे ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, सातारा जिल्हा प्रभारी सदाशिव खाडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या आवाहनानुसार ''माझा बुथ कोरोनामुक्त बुथ, माझा बुथ लसीकरणयुक्त बुथ'' या तत्त्वानुसार सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी काम करावे, असे ठरले.

या बैठकीला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदन भोसले, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड किंवा हॉस्पिटलची माहिती वेळेवर मिळावी, त्याचप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे आणि लोकांचे प्राण वाचावेत यासाठी भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी १५ कार्यकर्त्यांची टीम तयार केली आहे. तसेच प्रत्येक शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी दहा असे एकूण १७५ जणांची टीम तयार केली आहे. या टीमकडे बेड उपलब्धता आणि हॉस्पिटलची माहिती, इंजेक्शनबाबत माहिती, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती, रुग्णालयाकडून जादा बिल आकारणीबाबतच्या तक्रारी निवारण, लसीकरणाबाबत माहिती आणि कोरोना कोविड सेंटरबाबत माहिती हे विभाग वाटून दिले आहेत आणि त्यांचे काम चालू झाले आहे.

जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी केलेल्या सूचनेनुसार सातारा जिल्हा संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वढणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोन नंबर आणि नावे हेल्पलाइन म्हणून दिली आहेत.

सातारा, जावळीसाठी विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, डॉ. उत्कर्ष रेपाळ, डॉ. वीरेंद्र घड्याळे, कोरेगाव- राजेंद्र इंगळे, गणेश पालखे, आप्पा कदम, वाई, महाबळेश्वर, खंडाळा- सचिन घाटगे, अलंकार सुतार, माण, खटाव, फलटण- सुहास मुळे, जयकुमार शिंदे, कऱ्हाड, पाटण- महेंद्र डुबल, अजय पावसकर असे तालुके वाटून देण्यात आले आहेत. तसेच औषधांसाठी शैलेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: BJP's Coronation Support Committee Task Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.