निवडणुकीसाठी भाजपची उदयनराजेंना ‘आॅफर’-चंद्रकांतदादा अन् बापटांसोबत अर्धा तास चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:40 PM2018-04-07T23:40:26+5:302018-04-07T23:40:26+5:30

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची

 BJP's Udayan Rajen to contest 'Aapphire' - Chandrakant Dada and Bapat for half an hour | निवडणुकीसाठी भाजपची उदयनराजेंना ‘आॅफर’-चंद्रकांतदादा अन् बापटांसोबत अर्धा तास चर्चा

निवडणुकीसाठी भाजपची उदयनराजेंना ‘आॅफर’-चंद्रकांतदादा अन् बापटांसोबत अर्धा तास चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देविश्रामगृहात गुप्तगू

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरूहोती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची चर्चा याठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.
राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा रविवारी साताऱ्यात येत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच ही गोपनीय बातचीत झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

साताऱ्यात भाजप पक्षाचे मोठे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाची जागा पाहण्यासाठी तसेच पदाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवारी सायंकाळी साताºयात आले होते.मंत्री पाटील सायंकाळी सात वाजता विश्रामगृहावर दाखल झाले. पदाधिकाºयांशी चर्चा करत असताना मंत्री गिरीश बापट विश्रामगृहावर दाखल झाले. यानंतर काही वेळाने खासदार उदयनराजे भोसले हे देखील तेथे आले.

प्रतापगड सूटमधून ते अजिंक्यतारा सूटमध्ये आले. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील, नगरसेवक धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, अमित कुलकर्णी, सुधीर पवार यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असतानाच खासदार उदयनराजे भोसले दाखल झाले.

यानंतर चर्चेला मध्येच थांबवत दोन्ही मंत्र्यांनी उदयनराजे यांच्याशी कमराबंद चर्चा केली. चर्चेचा वृत्तांत गोपनीय ठेवण्यात आला असला तरी आगामी निवडणुकीत उदयराजे यांनी भाजपतर्फे लढावे, असा आग्रह धरल्याची चर्चा विश्रामगृहावर दबक्या आवाजात सुरू होती.

बापट म्हणाले, ‘राजे.. माझ्या खुर्चीवर बसा’
अजिंक्यतारा सूटमधील अ‍ॅन्टी चेंबरमध्ये उदयनराजे प्रवेशले, तेव्हा मंत्री गिरीष बापट आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहिले, ‘राजे.. तुम्ही या खुर्चीवर बसा. नाहीतर पंतांसमोर राजे बसले, अशी पुन्हा बातमी व्हायची,’ असे मिस्कीलपणे म्हणत बापट यांनी उदयनराजेंना समोरच्या मुख्य खुर्चीवर बसविले.

 

Web Title:  BJP's Udayan Rajen to contest 'Aapphire' - Chandrakant Dada and Bapat for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.