काळ्या बछड्यांच्या वार्तेने धांदल!

By admin | Published: October 2, 2015 11:33 PM2015-10-02T23:33:05+5:302015-10-02T23:35:06+5:30

पोवई नाक्यावर गर्दी : मांजरं की बिबट्याच्या पिलांबाबत संभ्रम

Black Calf Talks Hurry! | काळ्या बछड्यांच्या वार्तेने धांदल!

काळ्या बछड्यांच्या वार्तेने धांदल!

Next

ातारा : वन्यजीव सप्ताहाला गुरुवारी प्रारंभ झाला आणि लगेच शुक्रवारी पहाटे साताऱ्याच्या पोवई नाक्यावर दोन काळे बछडे हजर! काळे बिबटे परिसरात आहेत, याची खात्री सातारकरांना पटलेलीच आहे; मात्र हे बछडे होते, काळी मांजरं होती की अन्य कोणते प्राणी, हे गुलदस्त्यातच राहिलं आहे. या बातमीमुळं वनविभागाची धावपळ झाली खरी; पण कोणत्याही प्रसंगाला सामोरं कसं जायचं, याचं मार्गदर्शनही उपस्थितांना जागीच मिळालं! पोवई नाका हे एरवी गजबजलेलं ठिकाण. इथं आठ रस्ते एकत्र येतात. दिवसभर रहदारी आवरता आवरत नाही. अशा भागात, काँक्रीटच्या जंगलात शुक्रवारी उजाडण्यापूर्वीच चक्क काळ्या बिबट्याचे बछडे दिसले आणि ही बातमी वेगानं शहरभर पसरत गेली. पहाटे साडेपाचच्या सुमारास एका इमारतीच्या पायऱ्यांजवळ बछड्यांचं पहिलं दर्शन झालं. नंतर काहीजणांनी रस्त्याच्या एका बाजूला, तर काहींनी दुसऱ्या बाजूला त्यांना धावत जाताना पाहिलं. पूर्ण वाढ झालेल्या मांजरांएवढे हे पाहुणे बछडेच होते की काळी मांजरं, याबाबत संभ्रम निर्माण झाला.
काहींनी दुरून पाहुण्यांचे फोटो मोबाइलवर टिपले. परंतु जास्त अंतर आणि अंधूक प्रकाशामुळं ‘क्लोजअप’ स्पष्ट दिसेना. व्हॉट्सअ‍ॅपवरही मेसेज फिरले आणि भल्या पहाटेच पोवई नाक्याने गर्दी अनुभवली. काळे बिबटे : पूर्वपरंपरा सातारा शहराच्या परिसरात काळ्या बिबट्यांचे दर्शन अनेकदा झालंय. पहाटे शहराजवळच्या डोंगरावर फिरायला जाणाऱ्यांना काळे बछडे दिसलेत. एक काळा बिबट्या महामार्ग ओलांडताना काही महिन्यांपूर्वीच मृत्युमुखी पडला होता. कास परिसरात काळा बिबट्या दिसला होता, त्याला दीड वर्ष लोटलं. बिबट्याच्या मादीच्या पोटी एकाच वेळी एक पिवळा आणि दुसरा काळा बछडा जन्मास येऊ शकतो, हेही सातारकरांना आता ठाऊक आहे.
आक्रस्ताळेपणा नको
उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. दिसलेले बछडेच असतील, तर त्यांच्या मागे-पुढे मादी असण्याची शक्यता आहे. सकाळ होण्यापूर्वी मादी बछड्यांना घेऊन निघूनही गेली असेल. मात्र, आक्रस्ताळेपणा टाळून धीरानं परिस्थिती हाताळली पाहिजे, असं अंजनकर यांनी सांगितलं. केसाची होणार डीएनएचाचणी हे शंकास्पद काळे पाहुणे जिथं दिसले, तिथं वन कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता, एक केस त्यांना सापडला आहे.डीएनए चाचणीसाठी पाठवून तो केस बिबट्याचा की मांजराचा, याचा शोध घेतला जाणार आहे

Web Title: Black Calf Talks Hurry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.