सातारच्या उपमुख्याधिकाऱ्यावर ठपका

By admin | Published: February 10, 2015 10:25 PM2015-02-10T22:25:28+5:302015-02-10T23:57:26+5:30

विभागीय चौकशीत दोषी : बेकायदेशीर गाळे वाटल्याचा आरोप

Blasphemy on Saturn's Deputy Chief | सातारच्या उपमुख्याधिकाऱ्यावर ठपका

सातारच्या उपमुख्याधिकाऱ्यावर ठपका

Next

लातूर : येथील महापालिकेचे तत्कालीन मालमत्ता व्यवस्थापक सध्या सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी म्हणून काम पाहात असलेले आर. एच. कुटकर यांच्यावर विभागीय चौकशी समितीने अनधिकृत रित्या बेकायदेशीर गाळे वितरण करणे व वापरास देण्यास दोषी ठरविले आहे. १० एप्रिल २०१३ पासून ही चौकशी सुरु होती. चौकशी समितीने चार दिवसांपूर्वी हा अहवाल महापालिकेला दिला. तो मंगळवारी बाहेर आल्याने अधिकाऱ्यात एकच खळबळ उडाली. आपल्या नगरपालिकेच्या साठ वर्षातही एकाही कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी न झालेल्या लातूरमध्ये महापालिका होताच कोणत्याही कर्मचाऱ्याची लागलेली ही पहिली विभागीय चौकशी आहे. कुटकर हे लातूर महापालिकेत सेवेत असताना विक्रांत गोजमगुंडे, शैलेश स्वामी, राहूल माकणीकर आणि असगर पटेल या चार नगरसेवकांनी तत्कालीन प्रभारी आयुक्त डॉ. धनंजय जावळीकर यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीत पाच आरोप ठेवण्यात आले होते. डॉ. जावळीकर यांनी या आरोपांची दखल घेत शासनाच्या पॅनलवरील सेवानिवृत्त वित्त व लेखा अधिकारी बी. सी. हंगे यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०१३ ला खास समिती नेमली. या प्रकरणात चौकशी समितीने सहा साक्षीदार तपासले. या समितीने केलेल्या चौकशीत मनपाच्या गाळ्यांचे अनधिकृतरित्या वितरण करणे आणि वापरायला देणे या प्रकरणात दोषी ठरविले आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम तीनचे उल्लंघन करण्यासही अंशत: दोषी ठरविले.
लातूरला १९५२ साली नगरपरिषद स्थापन झाली होती. ५२ ते २०१२ या ६० वर्षाच्या नगरपरिषदेच्या काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी झाली नव्हती. परंतु २०१२ साली मनपा झाल्या- झाल्या पहिल्यांदाच कुटकर यांच्याविरुध्द विभागीय चौकशी नियुक्त झाली. महापालिकाच काय तर नगरपालिका असतानापासून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुध्द नेमलेली ही पहिलीच विभागीय चौकशी असल्याने याचे कुतूहल होते. ते चौकशीत दोषी आढळल्याने आता कुटेकर यांच्यावर आयुक्त काय कारवाई करतात? याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे डोळे लागले आहेत. जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर कारवाईचा चेंडू स्थायी समिती किंवा महापालिकेची सभेकडे जाणार
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Blasphemy on Saturn's Deputy Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.