४३ वर्षांमध्ये ५४ वेळा रक्तदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:53+5:302021-07-03T04:24:53+5:30

रक्तदान शिबिर अनेक सामाजिक संस्था आयोजित करत असतात. रक्ताला पर्याय नसल्याने दवाखान्यांमधून रक्तदानाबाबत सातत्याने आवाहन केले जाते. अशा वेळी ...

Blood donation 54 times in 43 years! | ४३ वर्षांमध्ये ५४ वेळा रक्तदान!

४३ वर्षांमध्ये ५४ वेळा रक्तदान!

googlenewsNext

रक्तदान शिबिर अनेक सामाजिक संस्था आयोजित करत असतात. रक्ताला पर्याय नसल्याने दवाखान्यांमधून रक्तदानाबाबत सातत्याने आवाहन केले जाते. अशा वेळी तरुणांना जमविताना काय दिव्य करावे लागते हे संबंधित आयोजक आणि रक्तपेढ्यांनाच माहीत असते. पण साताऱ्यात अशी कसरत करण्याची वेळ फारशी येत नाही. त्यामुळे तरुणांचे अनेक समूह रक्तदान कार्यात झोकून देऊन कार्य करत आहेत. अगदी कोकण, मुंबईत जाऊन ते रक्ताची गरज भागवत असतात. त्याचप्रमाणे काही ज्येष्ठ नागरिक तरुणांना लाजवतील अशा पद्धतीने काम करत असतात.

वाई येथील निवृत्ती पाटील यांचेही असे आहे. निवृत्ती पाटील यांचे मंडईत जनरल दुकान आहे. पाटील हे वयाच्या २१ व्या वर्षी रोहा येथील एका कंपनीत काम करत होते. तेव्हा १ मे रोजी संबंधित कंपनीला महाराष्ट्र दिनादिवशी सुटी होती. घरी काहीच काम नसल्याने ते मित्रांसमवेत फिरायला गेले. तेथे रक्तदान एका सामाजिक संस्थेने कामगार दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आपणही कामगार आहोत त्यामुळे रक्तदान केले पाहिजे, हा विचार करून त्यांनी रक्तदान केले अन् रक्तदान करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.

त्यानंतर सलग ३८ वर्षे दरवर्षी कामगार दिनी रक्तदान करत होते. त्यानंतर दर चार महिन्याने रक्तदान करू लागले. त्यामुळे आतापर्यंत अवघ्या ४३ वर्षांमध्ये ५४ वेळा रक्तदान केले आहे.

चौकट

समाजमाध्यमांवर सक्रिय

निवृत्ती पाटील हे सातत्याने रक्तदान करत असल्याने त्यांना ‘ब्लड डोनर सातारा’ या ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतले. त्या ठिकाणी कोणी रक्तदान शिबिर आयोजित केले असल्यास किंवा दवाखान्यात रक्ताची गरज असल्यास माहिती मिळत असायची. साहजिकच तेथे जाऊन रक्तदान करतात. आता पाटील यांनीच ‘रक्तदाते सह्याद्री’ हा ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये राज्यभरातील तरुण सहभागी असल्याने कोठे गरज भासली तर तातडीने जाऊन रक्तदान करतात.

कोट :

शिबिर कोणी आयोजित केले हे कधीच महत्त्वाचे नसते तर रक्तदान शिबिर आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणांनी तेथे जाऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. कारण ते रक्तदान नसून प्राणदान असते.

- निवृत्ती पाटील, वाई.

फोटो सेव्ह आहे... ०३निवृत्ती पाटील

Web Title: Blood donation 54 times in 43 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.