विश्वाधार प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:41 AM2021-05-20T04:41:44+5:302021-05-20T04:41:44+5:30
मसूर : खराडे (ता. कराड) येथील विश्वाधार प्रतिष्ठान व रक्ताचे नाते संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व संतोष ...
मसूर : खराडे (ता. कराड) येथील विश्वाधार प्रतिष्ठान व रक्ताचे नाते संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व संतोष जाधव क्रीडा मंडळाच्या सहकार्याने धर्मवीर संभाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरात सुमारे ४० युवकांनी रक्तदान केले.
महालक्ष्मी ब्लड बँक, कराडच्या संचालिका विना ढापरे, तंत्रज्ञ पवन नलगे, रोहित सुर्यवंशी, दत्तात्रय पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव, बाजार समिती, कराडचे माजी उपसभापती आत्माराम जाधव, जालिंदर जाधव, जयसिंगराव जाधव, तलाठी एम. बी. फुंडकर, ग्रामसेवक रमेश माळी, विश्वजीत कदम, श्रीधर मोरे, सुनील जाधव, संदीप जाधव, वैभव जाधव, संजय जाधव, श्रवण जाधव, अजय जाधव, सागर जाधव तसेच विश्वाधार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व संतोष जाधव क्रीडा मंडळाच्या युवकांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे स्वागत सेवानिवृत्त जवान संतोष जाधव यांनी केले. सुनील जाधव यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन- खराडे, ता. कराड येथे रक्तदान शिबिरप्रसंगी महालक्ष्मी ब्लड बँकेच्या संचालिका विना ढापरे व उपस्थित युवक.