रणसिंगवाडी येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:50 AM2021-02-20T05:50:35+5:302021-02-20T05:50:35+5:30

पुसेगाव : रणसिंगवाडी येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे ...

Blood donation camp on the occasion of Shiva Jayanti at Ransingwadi | रणसिंगवाडी येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

रणसिंगवाडी येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

googlenewsNext

पुसेगाव : रणसिंगवाडी येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख आप्पा घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि हर्ष फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात ५६ दात्यांनी रक्तदान करुन एक आदर्श निर्माण केला. या शिबिराला युवक, युवती व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला एक लाख रुपयांचा मोफत विमा आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी घोरपडे म्हणाले, ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. एका मानवाचेच रक्त दुसऱ्या गरजू मानवाला चालते. आजच्या युगात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. भविष्यात रणसिंगवाडीत वैद्यकीय मदत कक्ष व सरकारी आरोग्य योजना ट्रस्टमार्फत पुरविण्यात येणार आहे. डॉल्बी, मिरवणूक अशा कार्यक्रमांना फाटा देत रक्तदानसारख्या सामाजिक उपक्रमाचे संयोजन शिवजयंतीनिमित्ताने ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वीपणे पार पडल्याने परिसरात कौतुक होत आहे.

Web Title: Blood donation camp on the occasion of Shiva Jayanti at Ransingwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.