साताऱ्यात रक्ताचं नातं रक्तदान मोहिम आजपासून सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:01+5:302021-07-02T04:27:01+5:30

रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळते. कोरोनाच्या स्थितीनंतर आता थांबलेली ऑपरेशन्स सुरु होणार आहेत. त्यानंतर लागणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी मोठ्या ...

Blood donation campaign in Satara starts from today | साताऱ्यात रक्ताचं नातं रक्तदान मोहिम आजपासून सुरु

साताऱ्यात रक्ताचं नातं रक्तदान मोहिम आजपासून सुरु

Next

रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळते. कोरोनाच्या स्थितीनंतर आता थांबलेली ऑपरेशन्स सुरु होणार आहेत. त्यानंतर लागणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता आहे. याच उद्देशाने लोकमतने पुढाकार घेत रक्तदान मोहिम आयोजित केली आहे. स्वातंत्र्यसेनानी तथा लोकमतचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाची हाक दिली आहे. ही रक्तदान मोहिम आजपासून सुरु होत आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकमतच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकमतच्यावतीने दरवर्षी २ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात रक्तदानावर मर्यादा आल्या आहेत. काही शस्त्रक्रियादेखील थांबल्या आहेत. अशा शस्त्रक्रिया आता करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासणार आहे. रक्तपेढ्यामधील रक्तही आता संपत आल्याने वेगवेगळ्या संघटनांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. थँलेसिमिया, सिकलसेल या रुग्णांची रक्ताच्या तुटवड्यामुळे गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना, आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. त्यामुळे वेळेत रक्तदाता शोधणे अवघड होऊन जाते. यासाठी रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठविण्याची व्यवस्था आहे. तसेच रक्ताचे इतर घटकही वेगळे करुन ते इतरांसाठीही वापरले जातात. हेही अनेकांसाठी जीवनदायी ठरते.

सध्याच्या स्थितीत रक्ताची असलेली गरज आणि त्यातून अनेकांना मिळणारे जीवदान यामुळे लोकमतने सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. आज सातारा आणि कराड तालुक्यात रक्तदान शिबीर होणार आहे.

चौकट

रक्तदानासाठी येथे संपर्क साधावा

लोकमतच्यावतीने पंधरा दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना ग्रृपने तसेच संस्था, संघटना, तालीम संघ, गणेश मंडळे, तरुण मंडळांना या महाअभियानात सहभागी व्हायचे असेल त्यांनी शिबिराच्या आयोजनासंदर्भात शिवानी पावटे ९९६००३००६९ तसेच स्नेहा तोडकर ८७९६२४११११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

चौकट

याठिकाणी होईल रक्तदान शिबीर

दिनांक गाव स्थळ संपर्क

२ जुलै सातारा ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा, शाहुपुरी शिवानी पावटे - ९९६००३००६९

सिव्हिल हॉस्पिटल, सातारा

अक्षय ब्लड बँक, सातारा

बालाजी ब्लड बँक, सातारा

माऊली ब्लड बँक, सातार

२ जुलै कऱ्हाड लायन्स क्लब, यशवंत ब्लड बँक, कऱ्हाड स्नेहा तोडकर ८७९६२४११११

शारदा क्लिनिक ( डॉ. एरम हॉस्पिटल ) कऱ्हाड

गणपती मंदीर, वारुंजी फाटा, कऱ्हाड

३ जुलै सातारा राजधानी टॉवर, पहिला मजला, सातारा शिवानी पावटे - ९९६००३००६९

४ जुलै सातारा राजधानी टॉवर, पहिला मजला, सातारा

४ जुलै वाई त. ल. जोशी विद्यालय हॉल, धर्मपूरी, वाई पांडूरंग भिलारे - ७४९९७९७३९९

४ जुलै फलटण महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, रिंगरोड, फलटण नासीर शिकलगार - ९८६०००४७३०

६ जुलै वडूज पंचायत समिती हॉल, वडूज शेखर जाधव - ८३८००५८९१०

६ जुलै महाबळेश्वर पोलीस स्टेशन, डॉ. साबणे रोड, महाबळेश्वर अजित जाधव - ९४०४४०६४४४

७ जुलै कोरेगाव रोटरी गार्डन, हुतात्मा स्मारक, मेन रोड, कोरेगाव साहिल शहा - ९६२३२९९०००

७ जुलै उंब्रज गरज रक्ताची ग्रृप, प्राथमिक जि. प. शाळा, उंब्रज अजय जाधव - ९९२२९२८१४२

७ जुलै दहिवडी श्री. सिद्धनाथ मंगल कार्यालय, एस. टी. स्टँण्ड, दहिवडी नवनाथ जगदाळे - ९४२३८२७३२५

९ जुलै पाटण बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण प्रवीण जाधव - ७५८८६३८९२५

१० जुलै सैदापूर ( कराड ) आधार सामाजिक संस्था, सैदापूर प्रमोद सुकरे ९९२१९८०१६१

११ जुलै कालवडे ( कराड ) कोलाईदेवी हॉल, कालवडे प्रमोद सुकरे ९९२१९८०१६१

११ जुलै शिरवळ ( खंडाळा ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चावडी चौक, शिरवळ मुराद पटेल - ८००७९०१७८६

Web Title: Blood donation campaign in Satara starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.