साताऱ्यात पुन्हा जागली रक्तदान चळवळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:54+5:302021-07-14T04:43:54+5:30
सातारा : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमिताने ‘लोकमत’ने नातं रक्ताचं ही चळवळ उभारली आहे. याला सातारा जिल्ह्यातून ...
सातारा : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमिताने ‘लोकमत’ने नातं रक्ताचं ही चळवळ उभारली आहे. याला सातारा जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातील छत्रपती मराठा साम्राज्य संस्थेच्या मावळ्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये महिलाही उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने साताऱ्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. शेखर गोसावी, निवृती पाटील आदी उपस्थित होते. शिबिरास सकाळ नऊ वाजता सुरुवात झाली. सकाळपासून तरुणांनी रक्तदानासाठी उपस्थिती लावली होती.
शिबिर यशस्वी करण्यासाठी छत्रपती मराठा साम्राज्यचे ओंकार देशमुख, अभिजित जाधव, सूर्यकांत मोहिते, शुभम महामुळकर, योगिता घाडगे, दीपक माने, प्रियांका साबळे, अतुल भोसले, निवृत्ती पाटील, दत्ता शिंदे, कैलास बाकले, स्वप्नील जाधव, गणेश काळंगे यांनी परिश्रम घेतले.
ए पॉझिटिव्ह रक्तदाते
सिद्धांत हांडे, राहुल कदम, अमितकुमार नलवडे, शिवाजी घाडगे, प्रज्योत माने, रेश्मा ढोणे, निखिल इंगळे, युवराज पवार, अभिजित बेलोशे, अभिजित जाधव, दत्तात्रय संकपाळ, धमेंद्र शिर्के, सुभाष भोसले.
ए निगेटिव्ह : पूनम वाघ, विक्रम जाधव.
बी पॉझिटिव्ह
अभिजित फडतरे, सचिन साळुंखे, अक्षय सुतार, राहुल निकम, सोमनाथ जगताप, सुजित शिंदे, अतुल भोसले, नीलम शिंदे, प्रज्योत जाधव, राजेंद्र जगदाळे, आशिष संकपाळ, तुषार गायकवाड, संतोष माने.
बी निगेटिव्ह
तनुजा जाधव.
ओ पॉझिटिव्ह
सुजित कदम, रोहन सावंत, सौरभ निकम, ओमकार देशमुख, अनिल कदम, बाळकृष्ण बर्गे, अनिकेत साबळे.
ओ निगेटिव्ह
निखिल निकम, स्वप्निल जाधव, चकोर घाडगे,
एबी पॉझिटिव्ह
प्रशांत वाघ, कविता घाडगे, आकाश महाडिक.
फोटो
१२आयएमए बल्ड
साताऱ्यात रविवारी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या हस्ते झाले. या वेळी छत्रपती मराठा साम्राज्य संस्थेचे ओमकार देशमुख, अभिजित जाधव उपस्थित होते.