कामथीच्या तरुणाचा पाटणमध्ये खून

By admin | Published: December 23, 2014 11:12 PM2014-12-23T23:12:15+5:302014-12-24T00:22:03+5:30

अल्पवयीन मुलगा ताब्यात : पुसेगावहून परतलेल्या दिंडीतील मारामारीत चाकूचा वार

The blood of Kamthi's youth is bloody | कामथीच्या तरुणाचा पाटणमध्ये खून

कामथीच्या तरुणाचा पाटणमध्ये खून

Next

पाटण : सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बाचाबाची झाल्यानंतर कामथी (ता. खटाव) येथील तरुणाचा सोमवारी रात्री चाकूने भोसकून खून करण्यात आला. पाटण पंचायत समितीच्या कार्यालयानजीक दिंडीत झालेल्या या खुनासंदर्भात सिद्धार्थनगर (पाटण) येथील एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विशाल मारुती भिसे (वय १९, रा. निमसोड, ता. खटाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुसेगाव येथील यात्रेत विशाल भिसे व संबंधित अल्पवयीन मुलाची मोबाइलमधील संभाषण डिलीट करण्यासंदर्भात बाचाबाची झाली होती. त्यावेळी त्या मुलाने विशाल भिसेला ‘तुला बघून घेतो,’ अशी धमकी दिली होती.
पुसेगावमधून परत निघालेल्या दिंडीतून दोघेही इतरांसमवेत पाटणला आले.दरम्यान, पंचायत समितीनजीक सोमवारी रात्री आठच्या सुमारास दिंडीतील काठीचा धक्का लागल्याच्या कारणावरून विशाल व संबंधित अल्पवयीन मुलाची जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत विशालच्या पोटात उजव्या बाजूला चाकू भोसकण्यात आला.
त्यानंतर विशालला त्याच्या नातेवाइकांनी तातडीने पाटण ग्रामीण रुग्णालयात हलविले. विशालची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे रात्री दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयातून पाटण पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. कऱ्हाड येथे शवविच्छेदन झाल्यानंतर विशाल भिसे याचा मृतदेह निमसोडला (ता. खटाव) पाठविण्यात आला. अल्पवयीन मुलास पोलिसांनी सातारा येथील बाल न्यायालयात हजर केले. (प्रतिनिधी)

आजोळी आला आणि घात झाला
विशाल भिसे पुनर्वसित कामथी (ता. खटाव) येथील रहिवासी. ज्ञानसाधना महाविद्यालयात तो एफवाय बीएस.सी या वर्गात शिकत होता. त्याचे आईवडील मुंबईला राहतात. विशाल एकुलता एक असून, त्याला एक बहीण आहे. दरवर्षी तो पुसेगावला दिंडीतून जात असे. खुनाच्या एक दिवस आधीच ‘मी उद्या येतोय,’ असा फोन त्याने त्याच्या आजोबांना केला होता; मात्र दिंडीसोबत तो आपल्या आजोळी गेला आणि त्याचा घात झाला. दरम्यान, आरोपी त्याचा नातेवाईकच असल्याचीही माहिती मिळाली आहे.

Web Title: The blood of Kamthi's youth is bloody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.