आईला संपविणाऱ्याचा खून

By Admin | Published: September 25, 2016 12:54 AM2016-09-25T00:54:28+5:302016-09-25T00:54:28+5:30

पाचजणांना अटक : बेवारस मानवी सांगाडाप्रकरणी पोलिसांकडून तपास

The blood of the mother who finishes the mother | आईला संपविणाऱ्याचा खून

आईला संपविणाऱ्याचा खून

googlenewsNext

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पिसाळवाडीजवळ काही दिवसांपूर्वी बेवारस स्थितीत मानवी सांगाडा आढळला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. आईचे जीवन संपविणाऱ्याचा सूड घेत आई आणि चुलतीचा खून झाला त्याच रक्षाबंधनादिवशीच ‘त्याचा’ खून करणाऱ्या पाचजणांना शिरवळ पोलिसांनी शिताफीने अटक केली.
चंद्रकांत बापूसाहेब कामथे (वय ४५, रा. पानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. राजाराम एकनाथ लोळे (३२), सुखदेव एकनाथ लोळे (२१), सनी नारायण लोळे (२२), शरद सर्जेराव लोळे (२६), समीर सर्जेराव लोळे (२३, सर्व रा. पानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिसाळवाडीजवळील माने कॉलनी हद्दीत नीरा नदीच्या पात्रालगत सोमवारी (दि. ५) सकाळी लहुदास पिसाळ यांच्या उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा शिरवळ पोलिसांना आढळला होता. यावेळी शिरवळ पोलिसांनी आकस्मिक मयत म्हणून केस दाखल केली होती.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने अठरा दिवसांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सांगाड्यावर आढळलेल्या वस्तू व बेपत्ता नोंदीवरून खून झालेल्या व्यक्तीची ओळख अवघ्या दोन दिवसांमध्ये पटविली.
खून झालेल्या चंद्रकांत कामथे यांची बेपत्ता झाल्याची फिर्याद पुणे जिल्ह्यातील सासवड पोलिस ठाण्यात झालेली होती. संबंधित चंद्रकांत कामथे यांचे वर्णन व कपड्यांचे प्रकार लक्षात घेत संबंधित मृतदेहाचा सांगाडा त्यांचाच असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी खून करणाऱ्यांचा मार्ग काढत संशयित राजाराम लोळे, सुखदेव लोळे, सनी लोळे, शरद लोळे, समीर लोळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. यावेळी संबंधितांचे इतर साथीदार फरार झाले.
संबंधितांनी खुनाची कबुली देताना सांगितलेला घटनाक्रम ऐकून पोलिसही थक्क झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलिस ठाणे हद्दीत २०१३ मध्ये रक्षाबंधनादिवशी पुरंदर तालुक्यातील वाल्हे हद्दीत सुनंदा नारायण लोळे यांचा खून झाला होता. या खुनाचा संशय चंद्रकांत कामथे यांच्यावर व्यक्त करण्यात येऊन त्यांना याप्रकरणी अटक झाली होती. त्या खून प्रकरणात चंद्रकांत कामथे हे सबळ पुराव्याअभावी न्यायालयामधून निर्दोष सुटले होते.
याबाबतचा राग मनात घेऊन संबंधितांनी चंद्रकांत कामथे यांना संपविण्याचा बेत आखला. त्यानुसार पाळत ठेवून गुरुवार, दि. १८ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनादिवशीच सकाळी साडेआठच्या सुमारास पानवडी घाटातील मालधऱ्याच्या ओढ्याजवळ दुचाकीवरून (एमएच १२ एचआर ४३१) सासवडकडे निघालेल्या चंद्रकांत कामथे यांचा पाठलाग केला. संबंधितांनी गाडी आडवी मारून कामथे यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करत त्यांचा खून केला. संबंधितांनी चंद्रकांत कामथे यांचा मृतदेह एका चारचाकी वाहनाच्या डिकीतून पुणे जिल्'ातील पानवडी, पिंपळे, पांगारे परींंचे, मांढर न्हावी, भोंगवली, सारोळा मार्गे सातारा जिल्'ातील शिरवळ, पिसाळवाडीजवळील माने कॉलनी हद्दीतील उसाच्या शेतात टाकून दिला.
यावेळी चंद्र्रकांत कामथे यांचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेहाचा सांगाडा आढळला होता. डीएनए तपासणी रासायनिक प्रक्रियेसाठी सांगाडा पुणे येथील बी. जे. मेडिकलला पाठविण्यात आला होता. यावेळी संबंधित मृतदेहाची कोणताही पुरावा नसताना ओळख पटविण्यात यश आल्याने संबंधित खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात शिरवळ पोलिसांना यश आले.
या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे तपास करीत आहे.
अठरा दिवस तपास
माने कॉलनी येथे आढळलेल्या मानवी सांगाड्याची ओळख पटविण्याचे मोठे आवाहन शिरवळ पोलिसांसमोर होते. पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, हवालदार रवींद्र कदम, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, मदन वरखडे, विनोद पवार यांनी अठरा दिवस अविरत तपास करीत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले.

 

Web Title: The blood of the mother who finishes the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.