सामाजिक बांधिलकीतून जोडलं रक्ताचं नातं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:02+5:302021-07-09T04:25:02+5:30
अंगापूर : सर्वच क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या अंगापूरकरांनी रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकीतून उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्ताचं नातं जोडलं. ...
अंगापूर : सर्वच क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या अंगापूरकरांनी रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकीतून उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्ताचं नातं जोडलं. या शिबिरात महिलांचा सहभाग लक्षवेधक होता.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने बुधवारी लोकमत व ग्रामपंचायत अंगापूर वंदन यांच्या संयुक्त विद्यमाने एवर्जीनाथ मंदिर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरांचा शुभारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संतोष कणसे, शिक्षण भवन मंडळाचे अध्यक्ष हणमंतराव कणसे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रनाथ नलवडे, नवनाथ गायकवाड, विश्वनाथ कणसे, प्रियांका निकम, वैशाली जाधव, नीलम कणसे, पोपट सुतार तसेच सुभाष जाधव राजेंद्र कणसे या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकीतून अगदी दोन दिवसांच्या अवधीत या शिबिराचे नियोजन केले होते. या शिबिरास परिसरातील तसेच स्थानिक सामाजिक संस्था, तरुण मंडळे, ग्रामस्थ, युवक-युवती महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांनी दिलेल्या भरघोस योगदानाबद्दल त्यांचे ‘लोकमत’ तसेच अक्षय बल्ड बँक सातारा यांनी कौतुक केले.
ए पाॅझिटिव्ह रक्तदाते
वसंतराव कणसे, शुभांगी जाधव, मंगेश बकरे, अभिषेक कणसे, एकनाथ कणसे, अमोल गायकवाड, ज्योतिराम कणसे, विक्रम कणसे, वैष्णवी जाधव, रविराज कणसे, विश्वास कणसे, दत्तात्रय कणसे, स्वप्नाली कणसे, अमित कणसे, सुयश कणसे, अजय कणसे, शुभम कणसे.
ए निगेटिव्ह रक्तदाते
विद्या निंबाळकर
बी पाॅझिटिव्ह रक्तदाते
संतोष कणसे, नवनाथ गायकवाड, शशिकांत कणसे, वर्षा कणसे, श्रेयस कणसे, राजेंद्र निंबाळकर, अभिषेक जाधव, तुषार गायकवाड, पृथ्वीराज कणसे, सीमा कणसे, हेमलता भुजबळ, राजेंद्र कणसे, गणेश कणसे, अनुराधा कणसे, अजित कणसे, सुजाता कणसे.
एबी पाॅझिटिव्ह रक्तदाते
ऋषीराज कणसे, ओंकार देशमुख, नवीन कणसे, आदिती कणसे, विलास कणसे, संकेत भुजबळ, विद्या कणसे.
एबी निगेटिव्ह रक्तदाते
नवनाथ कणसे
ओ पाॅझिटिव्ह रक्तदाते
सुभाष जाधव, राजू शेळके, आनंद शिंदे, अर्चना कणसे, हणमंत कणसे, विठ्ठल कणसे, प्रियांका निकम, रूपाली कणसे, गोविंद सुतार, श्रीरंग शिंदे, संजय शिरतोडे, तेजस कणसे, सुधीर कणसे, प्रवीण कणसे, नीलम कणसे, दत्तात्रय कणसे, सागर जाधव, जयश्री जाधव, शंकर कणसे, आदित्य कणसे, संजय कणसे, जगन्नाथ कणसे, आदिनाथ कणसे, दादासाहेब कणसे, ऋतुजा कणसे, शहाजी चव्हाण, तुषार कणसे, आदित्य कणसे.
०८अंगापूर
अंगापूर येथे रक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, संतोष कणसे, हणमंतराव कणसे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.