संचालक मंडळ व्यवस्थापन प्रभावीपणे राबवतेय : भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:58+5:302021-04-12T04:36:58+5:30

सातारा : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर तसेच त्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे, तरीही संस्था आपली प्रगती सक्षमपणे करत ...

Board of Directors manages management effectively: Bhosle | संचालक मंडळ व्यवस्थापन प्रभावीपणे राबवतेय : भोसले

संचालक मंडळ व्यवस्थापन प्रभावीपणे राबवतेय : भोसले

Next

सातारा : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर तसेच त्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे, तरीही संस्था आपली प्रगती सक्षमपणे करत आहे. याचे कारण म्हणजे संचालक मंडळाकडून अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेऊन काळानुसार बदलत आहे. आपले व्यावसायिक व्यवस्थापन प्रभावीपणे राबवत आहे, असे प्रतिपादन धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डाॅ. रवींद्र भोसले यांनी केले.

धन्वंतरी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक डाॅ. आनंद लाहीगुडे, जयवंत गायकवाड उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक प्रवर्तक, ज्येष्ठ संचालक गुरुवर्य डाॅ. कन्हैयालाल लाहोटी तसेच कोविड -१९ च्या महामारीमुळे व इतर कारणांनी निधन झालेल्या सभासद, ठेवीदार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

डाॅ. भोसले म्हणाले, टाळेबंदीमुळे कर्जदारांचे आर्थिक गणित विस्कटलेले असतानाही त्यांचा कर्ज वसुलीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. २८ फेब्रुवारी २०२१ अखेर संस्थेच्या ठेवी १५७ कोटी ६२ लाख झाल्या आहेत. संस्थेने कर्ज पुरवठा ११४ कोटी १२ लाख केला असून, ९० कोटी ७५ लाखांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांनी विषयपत्रिकेचे वाचन करून सभासदांचे शंका निरसन केले. याप्रसंगी व्हा. चेअरमन डाॅ. कांत फडतरे, संचालक डाॅ. अरविंद काळे, डाॅ. शिरीष भेाइटे, डाॅ. शकील अत्तार, डाॅ. सुनील कोडगुले आदी उपस्थित होते.

(वा. प्र)

फोटो : १० धन्वंतरी

Web Title: Board of Directors manages management effectively: Bhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.