मृतदेह आपल्या व्यक्तीचा.. दु:ख मृतदेह दुसऱ्या व्यक्तीचा.. चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:59 PM2018-07-29T23:59:02+5:302018-07-29T23:59:21+5:30

 Body of the dead body of your person .. Second person .. worry! | मृतदेह आपल्या व्यक्तीचा.. दु:ख मृतदेह दुसऱ्या व्यक्तीचा.. चिंता !

मृतदेह आपल्या व्यक्तीचा.. दु:ख मृतदेह दुसऱ्या व्यक्तीचा.. चिंता !

Next
<p>
महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने आख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. या अपघातात कोणाचे पितृछत्र हरपले तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुष कायमचा निघून गेला. शनिवारी मध्यरात्री व रविवारी सकाळी दरीतून एकेक करून मृतदेह बाहेर काढण्यात येत होते. मृतदेह बाहेर येताच नातेवाइकांकडून केला जाणारा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मृतेदह नातेवाइकाचा असला अन् नसला तरी कुटुंबीयांचे डोळे मात्र अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.
आंबेनळी घाटातील दाभीळ टोक येथे शनिवारी सकाळी खासगी बस दरीत कोसळून दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तीस कर्मचाºयांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना उघडकीस येताच दापोलीसह राज्यात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मृतांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता ८०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाइकांकडून आक्रोश केला जात होता. मृतदेह जसे बाहेर येतील तस-तसा हा आक्रोश आणखीनच वाढत होता. नातेवाईक शनिवारी दुपारपासून धुके अन् पावसाच्या धारा झेलत घटनास्थळीच बसून होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाइकांकडून ओळख पटविली जात होती. मृतदेह नातेवाइकाचा असला अन् नसला तरी त्यांचे डोळे मात्र अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. नातेवाइकांचा हा आक्रोश पाहून ‘सह्याद्री’ही गहिवरला. एकमेकांची समजूत काढताना मदतकार्य करणाºया नागरिकांनाही आपले अश्रू अनावर झाले नाहीत.
घाटातील वाहतूक बावीस तास बंद
आंबेनळी घाटात झालेल्या अपघातानंतर मदतकार्य करणाºया वाहनांखेरीच पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता बंद करण्यात आलेली वाहतूक रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. दरीतील सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर तब्बल २२ तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
अनेकांनी रात्र काढली जागून
रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरीतील मदतकार्य
थांबविण्यात आले. यानंतर पहाटे सहा वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. मदतकार्य करणाºया एनडीआरफच्या जवानांसह,
ट्रेकर्स व पोलिसांनी आख्खी रात्र जागून काढली.
बस तशीच राहणार...
आंबेनळी घाटातील दरीत कोसळलेली बस अक्षरश: चक्काचूर झाली आहे. बसचा केवळ सांगाडाच उरला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी बसचा काही भाग गॅस कटरने कापण्यात आला. ही बस दरीतून बाहेर काढणार नसल्याची माहिती देण्यात आली.
पोलिसांचा खडा पहारा
आंबेनळी घाटातील अपघातानंतर महाबळेश्वर व पोलादापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सर्वांनी चोवीस तास खडा पहारा दिला. तसेच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारीही कर्मचाºयांनी यशस्वी पार पाडली.

Web Title:  Body of the dead body of your person .. Second person .. worry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.