Satara News: कोयना नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, नातेवाइकांचा आक्रोश 

By प्रशांत कोळी | Published: March 1, 2023 06:47 PM2023-03-01T18:47:10+5:302023-03-01T18:47:39+5:30

शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाल्याने परीक्षेपूर्वी सुटी लागल्याने राहुल पोहण्यासाठी गेला होता

Body of drowned student found in Koyna river on third day in Satara, relatives wail | Satara News: कोयना नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, नातेवाइकांचा आक्रोश 

Satara News: कोयना नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, नातेवाइकांचा आक्रोश 

googlenewsNext

माणिक डोंगरे

मलकापूर : आनंदनगरी आगाशिवनगर येथील दहावीचा विद्यार्थी कोयना नदीत पोहायला गेला असता नदीपात्रात बुडाला होता. शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच रविवारी ही दुर्घटना घडली. बुडालेल्या मुलाच्या मृतदेहाचे शोधकार्य तीन दिवसांपासून सुरू होते. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह जुन्या कोयना पुलाजवळ नदीपात्रात तरंगताना आढळला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश परिहार हे पत्नी, दोन मुलांसह आनंदनगरी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा राहुल हा आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आज, २ मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. त्यानुसार शनिवार, दि. २५ रोजी शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाला होता. परीक्षेपूर्वी सुटी लागल्याने राहुल हा रविवारी दुपारी आगाशिवनगर येथे जाधव पाणवठ्यावर कोयना नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो अचानक बुडाला. 

घटनेची माहिती समजताच राहुलच्या कुटुंबीयांनी नदीपात्राकडे धाव घेऊन राहुलचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. रविवारी व सोमवारी शोधकार्य राबवूनही राहुल सापडला नाही. दरम्यान, मंगळवारी दिवसभर शोधाशोध केली. शोधत नातेवाईक जुन्या कोयना पुलाजवळ गेले असता मृतदेह कोयना नदीपात्रात तरंगताना आढळला. याची माहिती पोलिसांसह इतर नातेवाइकांना दिली. राहुलचा मृतदेह बघताच नातेवाइकांनी आक्रोश केला. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Body of drowned student found in Koyna river on third day in Satara, relatives wail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.