बोलक्या बाहुल्यांसंगे थिरकली पावले!

By Admin | Published: August 31, 2015 08:24 PM2015-08-31T20:24:39+5:302015-08-31T23:39:28+5:30

हा खेळ बाहुल्यांचा : ‘पपेट शो’ला शिट्ट्या अन् टाळ्यांचा कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद

Bolaaliyaasangasangake! | बोलक्या बाहुल्यांसंगे थिरकली पावले!

बोलक्या बाहुल्यांसंगे थिरकली पावले!

googlenewsNext

सातारा : धम्माल कॉमेडी, डान्स, पशुपक्ष्यांचा आवाज अन् हदयस्पर्शी कथा आणि ते ही बोलक्या बाहुल्यांच्या रूपात साकारल्या गेल्या. बालचमूनंही या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमाला शिट्ट्या अन् टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘ते आले आणि जिंकून गेले’ असाच काही अनुभव बोलक्या बाहुल्यांच्या ‘पपेट शो’च्या रूपाने चिमुकल्यांनी अनुभवला.‘लोकमत बालविकास मंच’तर्फे रविवारी (दि. ३०) येथील शाहू कलामंदिरात बोलक्या बाहुल्यांचा ‘हा खेळ बाहुल्यांचा’ ‘पपेट शो’ उत्साहात पार पडला. सातारा गंमत-जंमतची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे सादरीकरण चैताली माजगावकर-भंडारी यांनी केले.या कार्यक्रमाचे उद्घाटन नितीन बाबर, चैताली माजगावर-भंडारी, साधना साखरे, प्रकृती जियो फ्रेशचे डॉ. महामुनी, सातारा क्लिनिकल लॅबोरेटरीच्या नीलिमा क्षीरसागर, टॉयलॅण्ड शॉपीचे सुनील मणियार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘शेरखान’ने प्रेक्षकांमधून एंट्री मारताच लहानग्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर ‘देवा श्री गणेशा’ या कार्यक्रमाने ‘पपेट शो’ला सुरुवात झाली. जंगलचा राजा असणाऱ्या सिंहाची छोटासा उंदीरमामा शिकाऱ्याच्या तावडीतून कशा प्रकारे सुटका करतो; मग त्यांची कशी गट्टी जमते.
बाहुल्यांच्या माध्यमातून साकारलेल्या या कथेला बालचमूचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर ‘ओ राधा तेरी चुनरी’ या गाण्यावर दोरीवरची पपेट झाली. बाहुला-बाहुलीच्या लग्न सोहळ्याचा तर लहानग्या पाहुण्यामंडळींनी मनोसक्त आनंद लुटला. यानंतर झालेल्या ‘लुंगी डान्स’ या हिंदी गीतावर बाहुल्यांबरोबर मुलांनीही ठेका धरला. यावेळी टांगा, कुत्रा, कोंबडा, पोपट, मांजर, कावळा, कोकिळा, रेल्वेगाडी अशा अनेक पशुपक्ष्यांचे आवाज काढून कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली.
‘बंडू’च्या कथेने मुलांना स्वच्छतेचा संदेश दिला. यानंतर बोलणाऱ्या पपेटने बालचमूशी संवाद साधून सर्वांची मने जिंकली. ‘बम-बम बोले, ‘अग्गोबाई डग्गोबाई’ या गाण्यांवर बाहुल्यांनी केलेल्या नृत्याला लहानग्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. ‘सुनो गोर से दुनिया वालों’ या गाण्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)

कार्यक्रमाचे प्रायोजक एनआयकेटी
या मनोरंजन कार्यक्रमाचे प्रायोजकत्व देशातील सर्वात जास्त स्कॉलरशिप देणारी शासनमान्य स्वायत्त संस्था ‘एनआयकेटी’- नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ नॉलेज टेस्टिंग यांनी स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करणारी संस्था असा ‘एनआयकेटी’ चा नावलौकिक आहे.

आजच सभासद व्हा....
सभासद नोंदणीसाठी १५० रुपये भरून ३५० रुपयांपेक्षा भेटवस्तू बालचमूंना मिळत असल्यामुळे सभासद होण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. सातारा, कऱ्हाड ‘लोकमत’ कार्यालयात सदस्यांची नावनोंदणी सुरू असून लवकरच सभासदांसाठी ‘चिल्लर पार्टी’चे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वी सभासद होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.


आजच सभासद व्हा....
सभासद नोंदणीसाठी १५० रुपये भरून ३५० रुपयांपेक्षा भेटवस्तू बालचमूंना मिळत असल्यामुळे सभासद होण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. सातारा, कऱ्हाड ‘लोकमत’ कार्यालयात सदस्यांची नावनोंदणी सुरू असून लवकरच सभासदांसाठी ‘चिल्लर पार्टी’चे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वी सभासद होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

Web Title: Bolaaliyaasangasangake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.