पुस्तकांच्या गावी वर्षपूर्ती सोहळा शब्दचांदणे कार्यक्रम : भिलारला अ‍ॅम्फी थिएटरचे होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:02 PM2018-05-02T20:02:57+5:302018-05-02T20:02:57+5:30

सातारा : पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमधील या अभिनव उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत असून, दि. ४ मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अ‍ॅम्फी थिएटरचे उद्घाटनही होणार असून, शब्दचांदणे हा

Book completion ceremony for vocal songs: Bihillar to inaugurate Amphitheater | पुस्तकांच्या गावी वर्षपूर्ती सोहळा शब्दचांदणे कार्यक्रम : भिलारला अ‍ॅम्फी थिएटरचे होणार उद्घाटन

पुस्तकांच्या गावी वर्षपूर्ती सोहळा शब्दचांदणे कार्यक्रम : भिलारला अ‍ॅम्फी थिएटरचे होणार उद्घाटन

Next

सातारा : पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमधील या अभिनव उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत असून, दि. ४ मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अ‍ॅम्फी थिएटरचे उद्घाटनही होणार असून, शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
पुस्तकांच्या गावात ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनास दिलेल्या जमिनीवर सुमारे २५० रसिक आरामात बसून कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील, असे खुले प्रेक्षागृह (अ‍ॅम्फी थिएटर) बांधून पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने, निसर्गरम्य ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रेक्षागृहाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या गावातील श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या या खुल्या प्रेक्षागृहात सायंकाळी पाचला शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून विघ्नेश जोशी, निधी पटवर्धन, नचिकेत लेले, संदीप खरे, नंदेश उमप व कमलेश भडकमकर आदी कलाकार हा साहित्य व वाचनसंस्कृती या विषयीचा सांगीतिक-साहित्यिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तके, कादंबरी (दालन २) व चरित्रे-आत्मचरित्रे (दालन २) या नव्या पाच दालनांचा (पुस्तक घरांचा) प्रारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, मोनिका गजेंद्रगडकर, योगेश सोमण, ल. म. कडू, प्रदीप निफाडकर, अतुल कहाते, विश्वास कुरुंदकर, किशोर पाठक, विनायक रानडे आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर पुस्तकांच्या गावास भेट देणार आहेत, अशी माहिती मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

वाचनप्रेमींना आवाहन...

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव असलेले भिलार हे हजारो पर्यटक-वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. येथील निसर्गरम्य खुल्या प्रेक्षागृहात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक गप्पा आणि पुस्तकांचा सान्निध्य यांचा आनंद घेण्यासाठी वर्षपूर्ती सोहळ्याचे निमित्त साधून महाराष्ट्रातील वाचनप्रेमींनी या गावाला अवश्य भेट द्यावी, असे आग्रही आवाहनही मंत्री तावडे यांनी केले आहे.
 

 

Web Title: Book completion ceremony for vocal songs: Bihillar to inaugurate Amphitheater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.