ग्रंथ महोत्सव -- जागर वाचन संस्कृतीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:07 AM2019-01-05T01:07:26+5:302019-01-05T01:07:36+5:30
राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या
- प्रगती जाधव - पाटील
राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या जागराला वाहिलेले पालखीचे भोई कोणत्याही हेतूशिवाय एकत्र असताना अक्षर चळवळीचा हा जगन्नाथरुपी रथ पुढे जातो आहे, हेच साताºयाच्या मातीचे आणि येथे रुजलेल्या पुरोगामी संस्कृतीचे वैशिष्ट्य
आहे.
आज साताºयाचा ग्रंथमहोत्सव खºया अर्थाने तारुण्यात आहे. साहित्य वर्तुळात समीक्षेची कठोर वाणी बोलणाºया साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ग्रंथमहोत्सवाच्या यशस्वीतेचे मनापासून कौतुक केले. एरव्ही वाङमय पातळीवर अ ब क ड च्या भाषेत साहित्याची शास्त्रीय समीक्षा करणारे समीक्षक
नकोसे वाटतात. तिथे डॉ. सबनीस यांनी साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाच्या यशाचे रहस्य ‘ग्रंथ संस्कारच माणसाला जगवणारा आहे,’ अशा शब्दांत उलगडले. येथील साहित्य भोई कोणत्याही अहगंडाशिवाय वाचन संस्कृतीच्या जागरासाठी एकत्र येतात. शासकीय अधिकारी पदाधिकारी यांचे खºयाखुºया संघभावनेचे अद्वैत रूप येथे पाहायला मिळते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्हिजन २०१९ साठी जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा जलक्रांतीचा परिसंवाद एक साधक बाधक चर्चा ग्रंथमहोत्सवाच्या व्यासपीठावर झाली आणि जलसंवर्धनाचे गांभीर्य फार उत्कट पातळीवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, हाच ग्रंथ संस्कार अथवा जाणिवांची निर्मिती ग्रंथ महोत्सवाचा हेतू आहे आणि तो फलद्रूप होताना पाहणे याचि देही याचि डोळा ‘आनंद तरंग’ अनुभव आहे.
पहिल्या दशकाच्या वाटचालीत ग्रंथमहोत्सवाचा यूएसपी ठरणारे परिसंवाद प्रगल्भ साहित्य मंडळीसाठी असायचे; पण साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाने ही परंपरा मोडीत काढत अक्षर संस्कृतीचे नव सृजन करणाºया नव्या लेखकांना वाचकांना आपल्यामध्ये सामावून घेतले! त्यांच्या बौद्धिकतेला चालना मिळावी यासाठी नवलेखक, कवी यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याठिकाणी देणारे परिसंवाद हेच वैशिष्ट्य आहे.