कºहाडच्या शंभर बुलेटस्ची तीन जिल्ह्यांत बुकऽऽ बुकऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:56 PM2017-08-13T23:56:28+5:302017-08-13T23:56:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : सध्या युवकांकडून पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन केले जात आहे. कुणी महाबळेश्वर तर कुणी कोयनानगरला जातात. एकत्रिकपणे दुचाकीवरून निसर्गरम्य ठिकाणी एक दिवसाची सफर केली जातेय. मात्र, विद्यानगर परिसरातील अकरा मारुती दर्शन सोहळा समितीतील सुमारे २१५ युवकांनी शंभर बुलेट व तीन वाहनांच्या साह्याने एका दिवसात सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीचे दर्शन घेतले. तसेच प्रत्येक मारुतीच्या मंदिराला नारळाचे रोप भेट दिले.
सैदापूर, ता. कºहाड येथील अकरा मारुती दर्शन सोहळा समितीच्या २१५ युवकांच्या वतीने बुलेटवरून सुमारे २१५ किलोमीटरचा प्रवास करीत समर्थ रामदास स्थापित अकरा मारुतीचे एका दिवसात दर्शन घेतले. श्रावणातल्या दुसºया शनिवारी, दि. १२ रोजी पहाटे सहा वाजता या युवकांनी मारुती दर्शन वारीस कºहाड येथील कृ ष्णा नाका येथून प्रारंभ केला. २१५ युवकांनी शंभर बुलेट व तीन चारचाकी वाहनांच्या साह्याने पंधरा तासांचा प्रवास करत मारुतीचे दर्शन घेतले.
आठ बुलेटच्या साह्याने सोळा युवकांनी चार वर्र्षांपूर्वी अकरा मारुतीच्या दर्शनाची वारी सुरू केली होती. त्यास आता चांगलाच वाढता प्रतिसाद मिळाला आहे. समितीच्या युवकांचे यंदाचे चौथे वर्षे असून, मारुती दर्शनाची वारी मनोभावे पूर्ण केली. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची प्रथम भेट झालेल्या चाफळनजीकच्या शिंगणवाडी येथील पहिल्या मारुतीचे दर्शन घेऊन वारीस प्रारंभ केला. विशेष म्हणजे, दर्शन वारीत सहभागी झालेल्या युवकांनी उपवास धरला होता. शिंगणवाडी येथून प्रारंभ केलेल्या बुलेट वारीने चाफळला दोन मारुतीचे दर्शन घेत तसेच पुढे जात माजगाव, उंब्रज, मसूर, शहापूर, बहे बोरगाव रामलिंग बेट, बत्तीस शिराळा, जुने पारगाव येथून मानपाडळी येथील अकराव्या मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जोतिबा डोंगरावर समारोप झाला. पहाटे साडेसहा वाजता सुरु झालेल्या या बुलेटवारीचा दिवसभर पंधरा तासांचा व २१५ किलोमीटर अंतराचा प्रवास करून संध्याकाळी आठ वाजता समारोप करण्यात आला.
यावेळी काढण्यात आलेल्या बुलेट वारीला प्रत्येकी युवकांना तीनशे रुपये इतका खर्च आला. वारीमधील युवकांचे ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागतही करण्यात आले. शिवाय प्रत्येक मारुती दर्शनावेळी त्या ठिकाणी असलेल्या पुजाºयांना नारळाचे वृक्ष भेट देण्यात आले.
अंगावर भगवे टी-शर्ट, हातात ब्रँडेड मोबाईल, डोळ्यांवर गॉगल; मात्र तोंडावर मारुती स्त्रोत्र व आरती अशा आगळ्यावेगळ्या वेशात युवकांना पाहताच जो तो अवाक् होऊन जात होता. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून युवकांना थांबवून कौतुकाने विचारणाही केली गेली. युवकांकडून काढलेल्या या बुलेट वारीला पाहताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. आजच्या जमान्यात युवकांकडून भक्तिभावाने देवदर्शनही केले जातेय, हे पाहताच अनेकांकडून युवकांचे कौतुकही केले गेले.
अकरा मारुती दर्शन सोहळा समितीही स्थापन
देवदर्शनासाठी जाणाºया भाविकांकडून देवास नारळ, साखर तसेच घरगुती पदार्थ तसेच फुले यांचा नैवेद्य स्वरुपात प्रसाद चढविला जातो. मात्र, सैदापूर येथील अकरा मारुती दर्शन सोहळा समितीमधील युवकांनी आपल्यासोबत नारळाचे छोटेसे रोप आणले होते. ते प्रत्येक मारुतीचे दर्शन घेत तेथील पुजारी यांना भेट दिले. तसेच त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. आपल्या लाडक्या देवाला नारळाच्या स्वरुपात युवकांनी नैवैद्य दाखविला.
बुलेट वारीतून
आकर्षक संदेश
अकरा मारुती दर्शन सोहळा समितीमधील युवकांनी वाहनांवर ‘जय जवान, जय किसान’ तसेच ‘चिनी वस्तू टाळा’ असे संदेशाचे फलकही लावण्यात आले होते. ठिकठिकाणी मारतिी स्त्रोत्र व आरती म्हणून युवकांकडून दर्शन घेतले जात होते.
दिवसभर उपवास मनात देवदर्शनाचा ध्यास
युवकांनी दर्शनासाठी शनिवारी काढलेल्या वारीवेळी दिवसभर उपवास धरला होता. त्यांनी आहारासाठी सोबत उपवासाचे पदार्थही आणले होते. ठिकठिकाणी थांबत पाणी पिऊन पदार्थ खात देवाच्या दर्शनाचा मनात ध्यास धरत त्यांनी वारी पूर्ण केली.