लोणी-काळभोरमधून किटकनाशक चोरले दोन्ही आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: May 15, 2014 11:26 PM2014-05-15T23:26:39+5:302014-05-15T23:29:51+5:30

कºहाड : किटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांनी संबंधित लाखो रूपयांची किटकनाशके लोणी-काळभोर येथून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Both of the accused have stolen pesticide from the butter-colchole | लोणी-काळभोरमधून किटकनाशक चोरले दोन्ही आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात

लोणी-काळभोरमधून किटकनाशक चोरले दोन्ही आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात

Next

कºहाड : किटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांनी संबंधित लाखो रूपयांची किटकनाशके लोणी-काळभोर येथून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील एका व्यापार्‍याच्या वतीने गोडाऊन व्यवस्थापकाने याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली आहे. पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी गुरूवारी रात्री दोन्ही आरोपींना कºहाड पोलिसांकडून ताब्यात घेतले. अनिल मारुती खरात (वय ३२, रा. कोपर्डे हवेली, ता. कºहाड) कृष्णत गोपाळ चव्हाण (वय ३८, रा. नारळवाडी, मल्हारपेठ, ता. पाटण) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत़ शहरातील दत्त चौकात बुधवारी किटकनाशकांची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता शिवसृष्टी संकुल इमारतीसमोर दोन व्यक्ती किटकनाशकांची विक्री करीत असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले़ बॉक्स उघडून पाहिले असता पोलिसांना बायोक्लेम नावाचे प्रत्येकी ६0 हजार ४२0 रुपये किंमतीचे किटकनाशकांचे एकूण ५५ डबे आढळून आले. तसेच कृष्णत चव्हाण याला सोबत घेऊन पोलिसांनी नारळवाडी-मल्हारपेठ येथे लपवण्यात आलेली बायोक्लेमची ३३ बॉक्स जप्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Both of the accused have stolen pesticide from the butter-colchole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.