दोन्ही काँग्रेससह भाजपचीही ताकद पणाला, कोरेगावातील राजकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:12 PM2019-06-06T19:12:05+5:302019-06-06T19:22:24+5:30

प्रवासी व रिक्षाच्या नंबरवरून रिक्षा चालकाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वेदभवन मंगल कार्यालयासमोर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Both the Congress and the BJP have the strength, the pace of political movements in Koregaon | दोन्ही काँग्रेससह भाजपचीही ताकद पणाला, कोरेगावातील राजकीय हालचालींना वेग

दोन्ही काँग्रेससह भाजपचीही ताकद पणाला, कोरेगावातील राजकीय हालचालींना वेग

Next
ठळक मुद्दे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीरतिघांवर गुन्हा : लोखंडी रॉड अन् लाकडी दांडक्याचा वापर

कोरेगाव : कोरेगावच्या पहिल्या-वहिल्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ जून रोजी संपत असून, जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. १० ते १४ जून या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

दरम्यान, नगरपंचायतीतील पक्षीय बलाबल पाहता दोन्ही काँग्रेस सत्तेत भागीदार आहेत. मात्र, भाजपची जुळवून घेत नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा गट देखील आता सक्रिय झाला आहे. एकंदरीत दोन्ही काँग्रेससह नगरपंचायतीत प्रवेश करण्यासाठी भाजप आपली ताकद पणाला लावत आहे.

कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवला होता. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर बाचल व किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी खुले असल्याने राष्ट्रवादी च्या राजाभाऊ बर्गे यांची निवड झाली होती. उपनगराध्यक्षपदी जयवंत पवार यांना संधी देण्याचा निर्णय आमदार शिंदे यांनी घेतला होता.

अडीच वर्षांच्या पहिल्याच कार्यकालामध्ये नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये आमुलाग्र बदल झाला आणि नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी काही कारणांनी आमदार शिंदे यांच्याबरोबर फारकत घेत स्वत:चा सवतासुभा मांडला. इकडे राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच काँग्रेसमध्ये देखील किशोर बाचल आणि किरण बर्गे यांच्या सदस्यांमध्ये अंतर्गत मतभेद होते. नगराध्यक्षांनी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना बरोबर घेत स्वत:चा स्वतंत्र गट तयार केला. दरम्यानच्या काळात जयवंत पवार यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या संजय पिसाळ यांना संधी देण्याचा निर्णय आमदार शिंदे यांनी घेतला.

नगराध्यक्ष बर्गे यांच्या गटाने भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख महेश शिंदे यांच्याशी जुळवून घेत राज्य शासनाकडून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करून घेतली. लोकसभा निवडणुकीत देखील या गटाने महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे खुलेपणाने काम केले. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगराध्यक्षांच्या निवासस्थानी तळ ठोकून यंत्रणा कार्यान्वित केली होती. राष्ट्रवादीबरोबर टोकाची भूमिका घेत नगराध्यक्षांनी आमदार शिंदे यांची नगरपंचायतीच्या राजकारणात कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Both the Congress and the BJP have the strength, the pace of political movements in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.