उधारीच्या पैशांवरून दोघांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:17+5:302021-03-26T04:40:17+5:30
सातारा : येथील नवीन औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा हॉटेलसमोर असलेल्या चायनीज गाडा चालवणाऱ्या युवकाने उधारीच्या पैशातून दोघांना लाकडी ...
सातारा : येथील नवीन औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा हॉटेलसमोर असलेल्या चायनीज गाडा चालवणाऱ्या युवकाने उधारीच्या पैशातून दोघांना लाकडी दांडके, पाईपने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी गाडा मालक युवकासह आठजणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २३ रोजी रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय अशोक पवार (४१, रा. खिंडवाडी, ता. सातारा) व त्याचा मित्र अजिंक्य शिंदे हे दोघेजण चायनीज खाण्यासाठी एमआयडीसीतील कृष्णा हॉटेलसमोरील गाडय़ावर गेले होते. त्यावेळी तिथे चायजीन गाडामालक नितीन सावंत याने विजय पवार याला उधारीच्या पैशावरून चिडून जाऊन लाकडी दांडक्याने उजव्या डोळ्यावर, डोक्यावर, पाठीत मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी नितीन सावंतचे वडील उत्तम सावंत हे देखील शिवीगाळ करीत मारहाण करीत असताना अजिंक्य भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तिथे असलेल्या अनोळखी सहाजणांनी लोखंडी पाईप, दांडक्याने अजिंक्यला देखील मारहाण केली. या घटनेते विजय व अजिंक्य जखमी झालेले आहेत. आठजणांविरुध्द गर्दी, मारामारीसह दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक भोसले हे पुढील तपास करीत आहेत.