चोराडे गावानजीक सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दी सिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:08 PM2020-04-24T14:08:26+5:302020-04-24T14:10:58+5:30
या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील चोराडे व म्हासुर्णे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन दोन्ही गावे सील करण्यात आली असुन चोराडे गावातील असणारा पेट्रोलपंप चार दिवस बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहे.तरी अत्यावश्यक सेवाना यातुन सुट देण्यात आली आहे.
पुसेसावळी(सातारा) : चोराडे व खेराडे वांगी ही दोन्हीही गावे सातारा सांगली जिल्ह्याच्या सर हद्दी वर आहेत त्यामुळे पै पाहुणे सगे सोयरे असे नाते संबंध या दोन गावात असल्यामुळे चोराडे व म्हासुर्णे या गावातील लोक अंत्यसंस्कारासाठी खेराडे वांगी येथे गेले होते.
या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील चोराडे व म्हासुर्णे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन दोन्ही
गावे सील करण्यात आली असुन चोराडे गावातील असणारा पेट्रोलपंप चार दिवस बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहे.तरी अत्यावश्यक सेवाना यातुन सुट देण्यात आली आहे.
त्यामुळे या गावातील लोकांनी विनाकारण गावातुन फिरु नये. अशा सुचना देण्यात आल्या. काहींना याबाबत गांभीर्य नाही अशांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच चोराडे गावात बाहेरुन अालेल्या दोघांना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, प्रांताधिकारी अश्विनी जिरगे, तहसीलदार अर्चना पाटील,स.पो.नि उत्तम भापकर यांनी चोराडे व म्हासुर्णे गावास भेट
देऊन परिस्थितीची पाहणी केली.