ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा मृत्यू

By admin | Published: April 13, 2017 02:04 PM2017-04-13T14:04:01+5:302017-04-13T14:04:01+5:30

नांदगावातील दुर्घटना : नांगरट सुरू असताना ताबा सुटला

The boy died in a tractor well in the well | ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा मृत्यू

ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा मृत्यू

Next

आॅनलाईन लोकमत

कऱ्हाड (सातारा), दि. १३ : शेतात नांगरट सुरू असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा जागीच मृत्यू झाला. नांदगाव, ता. कऱ्हाड येथील डोकरमाळ नावच्या शिवारात बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुदैर्वी घटना घडली.

पंकज पांडुरंग पाटील (वय २५) असे त्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील पंकज पाटील या युवकाची डोकरमाळ नावच्या शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीत सध्या मशागतीचे काम सुरू होते. मशागतीच्या कामासाठी पंकजने त्याच्या मावशीचा ट्रॅक्टर आणला होता. या ट्रॅक्टरद्वारे पंकज स्वत:च्या तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची कामे करून देत होता.

बुधवारी रात्री तो डोकरमाळ शिवारात चुलत्यांच्या शेतजमिनीत नांगरट करण्यासाठी गेला होता. डोकरमाळ हे शिवार डोंगर पायथ्याला आहे. पंकज ज्या शेतात नांगरटीसाठी गेला होता त्या शेतालगत सुमारे पन्नास फूट खोल विहीर असून, संबंधित विहिरीला पाणी नाही. त्यामुळे ती विहीर मुजविण्याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला होता. मशागतीचे काम संपल्यानंतर विहीर मुजविली जाणार होती.

पंकज एकटाच त्या शिवारात नांगरट करीत होता. नांगरट करीत तो विहिरीजवळ गेला. त्यावेळी ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. त्यामध्ये पंकजचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. रात्री उशिरा घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.

Web Title: The boy died in a tractor well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.