कऱ्हाडात सिमेंटच्या बाकड्यांची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:35+5:302021-02-11T04:40:35+5:30
पांढरवाडी येथे मोफत वाचनालयास प्रारंभ कऱ्हाड : पांढरवाडी, ता. पाटण येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संजयराव शिंदे यांनी ...
पांढरवाडी येथे मोफत वाचनालयास प्रारंभ
कऱ्हाड : पांढरवाडी, ता. पाटण येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संजयराव शिंदे यांनी तारळे येथे मोफत वाचनालय सुरू केले आहे. त्यांच्या या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. यावेळी उपसभापती अभिजित जाधव, शिवदौलत बँकेचे संचालक अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे, रामचंद्र देशमुख, राजेंद्र जाधव, बाळासाहेब रांजणे, संतोष भांडवलकर, नारायण डफळे, प्रल्हाद पवार, चंदू पवार, सूरज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संतकृपा महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर
कऱ्हाड : घोगाव, ता. कऱ्हाड येथील संतकृपा शिक्षणसंस्था संचलित संतकृपा फार्मसी महाविद्यालयात शुक्रवारी (दि. १२) मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. शिबिरमध्ये कर्करोगाचे चाचणी करण्यात येणार आहे. घोगाव, उंडाळे परिसरातील ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, सचिव प्रसून जोहरी यांनी केले आहे.
तारेत अडकलेल्या पारव्याला जीवदान
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी तारेच्या कुंपणात अडकलेल्या पारव्याला जीवदान दिले. विद्यालयाच्या पाठीमागील बाजूला पोलीस ग्राउण्ड आहे. या ग्राउण्डमध्ये असणाऱ्या आडातील पाणी व्यवस्थित रहावे, त्यामध्ये झाडाची पाने पडू नयेत यासाठी जाळी लावण्यात आली आहे. मात्र या जाळीच्या दोऱ्यांमध्ये पारव्याचा पाय अडकला. ही बाब सोहम पाटील, हर्षद चव्हाण यांनी हरित सेनेचे समन्वयक जगन्नाथ माळी तसेच महेंद्र अंबवडे यांना सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पारव्याला सुरक्षितरीत्या सोडवून जीवदान दिले.
जिल्हास्तर निबंध स्पर्धेत उज्ज्वला मोरे यांचे यश
कऱ्हाड : सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेमध्ये येथील विठामाता विद्यालयाच्या शिक्षिका उज्ज्वला जनार्दन मोरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. ‘तारणहार अन्नदाता : किसान, उसके प्रति सरकार और नागरिकोंका उत्तरदायित्व’ हा त्यांच्या निबंधाचा विषय होता. स्पर्धेत अकरा तालुक्यातील हिंदी शिक्षक सहभागी झाले होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सचिव जयंत पाटील, खजिनदार संजय बदियाणी, प्रकाश पाटील, मुख्याध्यापक व्ही.एस. पवार, उपमुख्याध्यापक एम.पी. कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.