ललगुण येथील पुलाला भगदाड

By Admin | Published: April 15, 2017 12:38 PM2017-04-15T12:38:34+5:302017-04-15T12:38:34+5:30

संरक्षक कठडे ढासळले : दुरूस्ती करण्याची मागणी

The bridge in Halgun is a breakthrough | ललगुण येथील पुलाला भगदाड

ललगुण येथील पुलाला भगदाड

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

बुध जि. सातारा, दि. १५ : पुसेगाव-फलटण या मागावर वाहनांची सतत वर्दळ असते. या रस्त्यावरील ललगुण नजिकचा पूल एका बाजुने खचला असून मोठे भगदाड पडले आहे. पूल खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाल्याने चालकांना जीव मुठीत घेउनच प्रवास करावा लागत आहे़ या पुलाचे संरक्षण कठडेही ढासळले ैअसूून पुलाची लवकरात-लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

पुसेगाव-फलटण रस्त्याची आवस्था बिकट असतानाच ललगुण येथील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांना जीवाला घोर लागला आहे. आधीच बुध, वेटण ओढा, मोळ, भागातील सर्वच पुलांचे सरक्षण कठडे ढासळले असताना यामध्ये आणखीनच भर पडली आहे़ मोळ, डिस्कळ वरून पुसेगावला येताना ललगुण दरम्यान असलेल्या पुलाच्या दुरावस्थेचा आजिबात अंदाज येत नसल्याने या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या पुलाची दुरूस्ती करावी अशी मागणी ललगुण, डिस्कळ ग्रामस्थांमधून होत आहे.

आठ-दहा महिन्यांपासून पुलाची दुरावस्था झाली आहे. असे असतानाही कोणत्याच विभागाचे याकडे लक्ष नाही़ वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असताना या पुलाच्या दुरवस्थेची पुर्व कल्पना देणारा सुचना फलक हा पुल दुरूस्त होईपर्यंत लावल्यास अपघाताचा अनर्थ टळण्यास मदत होईल.
- विनोद घाडगे,
ललगुण, ग्रामस्थ

Web Title: The bridge in Halgun is a breakthrough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.