भुरकवडीतील येरळा नदीवरील पुलाचा भराव लागला खचू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:24 PM2020-10-27T19:24:34+5:302020-10-27T19:26:43+5:30

Ncp, Yerla, River, pwd, rain, sataranews भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली मागार्वर असलेल्या येरळा नदीवर मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून नव्याने पूल बांधला होता. तो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर दोन्ही बाजूकडील भराव अतिवृष्टीच्या महापूरामुळे खचत चालला आहे.

The bridge over the Yerla river in Bhurkawadi was filled up | भुरकवडीतील येरळा नदीवरील पुलाचा भराव लागला खचू

भुरकवडीतील येरळा नदीवरील पुलाचा भराव लागला खचू

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे पार्टीचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांकडून पाहणी कोट्यवधी रुपये पाण्याचा जाण्याचा धोका; ग्रामस्थांतून संताप

खटाव : भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली मागार्वर असलेल्या येरळा नदीवर मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून नव्याने पूल बांधला होता. तो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर दोन्ही बाजूकडील भराव अतिवृष्टीच्या महापूरामुळे खचत चालला आहे.

यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या पुलाला धोका निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे पार्टीचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी पाहणी दौऱ्यावेळी वडुज येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सागर देवकर उपस्थित होते.

या पूलाच्या पाहणीबरोबर गावची पाणी पुरवठा करणारी जुनी विहीर वाहून गेली आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांचे शेती पीके व शेती साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचीही पाहणी* देशमुख व मांडवे यांनी करून संबधीत यंत्रणेला फोनवरून तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, माजी सरपंच एस. के. कदम, माजी उपसरपंच ए. के. कदम, चेअरमन हणमंत कदम, माजी चेअरमन मधुकर कदम, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष कैलासराव जाधव, शरद कदम, मनोज कदम, पोलीस पाटील किरण कदम, जालिंदर कदम, दिलीप कदम, संतोष कदम उपस्थित होते.
चौकट

खटाव तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या औंधच्या यमाई देवस्थानला जाण्यासाठी भाविकांचे दृष्टीने महत्वाचा जवळचा मार्ग आहे. या पुलावरून नेहमी वर्दळ असते. मलवडी, निढल, खटाव, खातगुण, भुरकवडी, दरुज, दरजाई येथील भाविक या रस्त्यावरून जातात. पुलपलीकडे असणाऱ्या शेतीतून निघणाऱ्या मालाची वाहतूक, तसेच ऊसाच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या पुलावरूनच होते.

या पुलाला सहा वर्षे झाली असून पुलाची उंची देखील आहे. हा पूल बांधकाम विभागातर्फे बांधला आहे. पुलावरून आजवर पाणी गेले नव्हते परंतु यंदा पावसामुळे पुलावरून चार फूट पाणी वाहत होते. या पुलाचे काम केलेले ठेकेदार पुण्याचे असल्याने त्याच्याशी संपर्क होत नाही परंतु या पुलाचा भराव खचल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो.
 

Web Title: The bridge over the Yerla river in Bhurkawadi was filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.