पेटत्या मशालींनी उजळला ‘वसंत’गड ! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:13 PM2018-05-03T23:13:12+5:302018-05-03T23:13:12+5:30

कऱ्हाड : सोमवार, दि. ३० एप्रिलची मध्यरात्रीची बारा वाजण्याची वेळ. वसंतगडावर पेटलेल्या शेकडो मशाली परिसरातल्या लोकांना खुणावू लागल्या. अनेकांची पावलं गडाच्या दिशेने वळली. पाहतो तो काय? तेथे अवघी

'Bright' brighter with stomach laughter! Activities on the eve of Maharashtra Day | पेटत्या मशालींनी उजळला ‘वसंत’गड ! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपक्रम

पेटत्या मशालींनी उजळला ‘वसंत’गड ! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपक्रम

Next
ठळक मुद्दे‘वसंतगड संवर्धन’च्या शिलेदारांकडून मशाल महोत्सव; अवतरली शिवशाही

कऱ्हाड : सोमवार, दि. ३० एप्रिलची मध्यरात्रीची बारा वाजण्याची वेळ. वसंतगडावर पेटलेल्या शेकडो मशाली परिसरातल्या लोकांना खुणावू लागल्या. अनेकांची पावलं गडाच्या दिशेने वळली. पाहतो तो काय? तेथे अवघी शिवशाही अवतरलेली. होय, खरंच वसंतगड संवर्धन ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा आगळावेगळा कार्यक्रम करीत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढे या, असा जणू संदेशच दिला. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील लोकांतून कौतुक होऊ लागले आहे.

गड, किल्ले ही तर आमची ऐतिहासिक परंपरा. हा वारसा जपणं, जतन करणं हे तर आमचं परम कर्तव्यच; पण अलीकडच्या धामधुमीच्या काळात या साऱ्या गोष्टींचा लोकांना कुठंतरी विसर पडल्याचे दिसते. ऐतिहासिक स्थळे हनिमूनची ठिकाणे बहरताहेत की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय आणि या साºया गोष्टींना फाटा देण्यासाठी कºहाड-पाटण तालुक्यातील काही युवकांनी एकत्रित येऊन वसंतगड संवर्धन ग्रुपची स्थापना केली आहे आणि या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने गडांची स्वच्छता करणे, गडांचे महत्त्व पटवून देणे आणि ते संवर्धनासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून या शिवप्रेमींनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता वसंत गडावर मशाल महोत्सव तर महाराष्ट्र दिनी स्वच्छता मोहीम राबविली. शेकडो मशाली पेटवून लोकांच्या मनात गड संवर्धन विषयीच्या मशाली पेटविण्याचे काम यानिमित्ताने त्यांनी केलं आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता वसंतगड संवर्धन ग्रुपचे युवक गडावर दाखल झाले. कुणाच्या हातात पेटलेल्या मशाली तर कुणाच्या हातात भगवा ध्वज, डोक्यावर भगवा फेटा आणि मुखात शिवरायांच्या पराक्रमांचे पोवाडे होते.

वेशभूषेतील मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशाने वसंतगडावर उत्साहात मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. दुसºया दिवशी पहाटे सहा वाजता प्रत्यक्षात गडावर स्वच्छता केली. यामध्ये तळ्यांसह तटबंदी, पायºया. बुरूंजसह संरक्षक कठड्यांची डागडुजीही केली.

तरुणांच्या मोबाईलवरपोवाडे अन् पराक्रमांची गीते
हल्ली कॉलेजमधील तरुणांच्या मोबाईलवर हिंदी चित्रपटातील गीतांचा खजिनाच भरलेला असतो. मात्र, वसंतगड स्वच्छता मोहिमेसाठी एकत्रित आलेल्या शिवप्रेमींमधील काहींनी स्वत:च्या मोबाईलमध्ये तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या गडस्वारीचे प्रसंग व पराक्रमाचे पोवाडे ठेवलेले होते. स्वच्छतेवेळी त्यांनी आपल्या मोबाईलवर पोवाडेही लावले.
 

मशालींबरोबर शिवरायांचे पराक्रमाचे प्रसंग
रात्री बारा वाजता गडावर मशाल महोत्सव भरविण्यासाठी शिवप्रेमी एकत्र आल्यानंतर थंडी पडली होती. अशात मनात शिवरायांच्या पराक्रमांचे प्रसंग आठवत गडावर शिवप्रेमींनी शिवशाही अवतरवली. यावेळी मशाली पेटवून शिवरायांच्या पराक्रमांचे प्रसंगही उपस्थित युवकांनी सांगितले.

Web Title: 'Bright' brighter with stomach laughter! Activities on the eve of Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.