जनकल्याण संस्थेला उज्ज्वल भविष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:17+5:302021-02-19T04:29:17+5:30
ते गायकवाडवाडी, ता.कराड येथे जनकल्याण सामाजिक संस्थेच्या सातारा जिल्हा कार्यकरिणीचा व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
ते गायकवाडवाडी, ता.कराड येथे जनकल्याण सामाजिक संस्थेच्या सातारा जिल्हा कार्यकरिणीचा व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदराव पवार होते, तर वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम, जनकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शर्मा, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कैलास माने, उपाध्यक्ष संतोश उपाध्ये, राष्ट्रीय मीडिया प्रभारी बलदेव सिंह, इस्माईल अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले जनकल्याण सामाजिक संस्थेने सातारा जिल्हयात शाखा स्थापन करून होतकरू तरुणांना संधी दिली आहे. या संस्थेला लागेल ती मदत करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी सातारा जिल्हा कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय गायकवाड, उपाध्यक्ष संजय चव्हाण, योगेश साळुंखे, दत्तात्रय मुळीक, कोषाध्यक्ष चंद्रकांत पवार, सचिव संतोष चव्हाण, सहसचिव कृष्णकांत पवार, मीडिया प्रभारी प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण आदींचा नियुक्तिपत्र व ओळखपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर गायकवाडवाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य प्रवीण पवार, जयसिंग पवार, आक्काताई शिरतोडे, रेश्मा पवार आदींचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले अनेक संस्था आपल्या परीने काम करत आहेत, परंतु आमची संस्था जनतेच्या हातात घालून काम करणारी आहे. सर्वसामान्यांचे तसेच तळागाळातील लोकांसाठी काम करून सर्वांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे या संस्थेला भारतभर पुढे आणून भारताला स्वदेशी राष्ट्र बनवण्याचा तसेच सेवाभावी कार्य करणे, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, अत्याचाराला विरोध, देशभक्ती कार्यक्रमांचे आयोजन करणे हा हेतू आहे. आज जगाने भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, परंतु भारत देशातील नागरिक विदेशातील संस्कृती स्वीकारत आहेत हे आम्हाला थांबवायचे आहे. आम्ही या संस्थेच्या शाखा पाच राज्यांत व २१५ जिल्ह्यात काढून संस्थेचा विस्तार वाढवून कार्यरत राहणार आहे.
संस्थेचे सातारा जिल्हा सचिव संतोष चव्हाण म्हणाले सातारा जिल्ह्यात आमच्यावर दिलेली जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू व संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊ, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन करून गोरख पवार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास अधिक गायकवाड, विठ्ठल गायकवाड, श्रीमंत पवार, तेजस घोलप, अक्षय घोलप, प्रमोद पवार, बाळकृशष्ण पवार, नानासो पवार, सतीश पवार, प्रकाश पवार, धोंडीराम पवार यांसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्श्न- गायकवाडवाडी, ता. कराड येथील कार्यक्रमात बोलताना प्रा.नितीन बानुगडे-पाटील, धैर्यशील कदम, राजेश शर्मा, कैलास माने व इतरफोटो कॅप्श्न- गायकवाडवाडी, ता.कराड येथील कार्यक्रमात बोलताना प्रा.नितीन बानुगडे-पाटील, धैर्यशील कदम, राजेश शर्मा, कैलास माने आदी.