नुकसानीचे फोटो आणून द्या, मग करू पंचनामा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:54+5:302021-05-13T04:39:54+5:30
अंबवडे येथीलच नवनाथ दत्तात्रय पाटील यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यांचीही ...
अंबवडे येथीलच नवनाथ दत्तात्रय पाटील यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यांचीही कागदपत्रे व नुकसानीचे फोटो न दिल्याने त्यांचेही नुकसानग्रस्तांच्या यादीत नाव नाही. नुकसानग्रस्तांनीच फोटो दिल्यावर पंचनामे होणार असतील, तर या शासकीय कर्मचाऱ्यांचे काम काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- चौकट
अंबवडे येथे सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापैकी चारजणांनी कोळे येथील तलाठी कार्यालयात नुकसानीचे फोटो आणि कागदपत्रे दिली आहेत. त्यांचेच पंचनामे करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या सर्व घटनेची माहिती आणि फोटो पुराव्यानिशी तलाठी कार्यालयात माहिती संचित करून ठेवणे बंधनकारक असतानाही येथील तलाठी यांच्याकडे ही माहिती का उपलब्ध नाही, याची चौकशी होणार का ?
- चौकट
तलाठी म्हणे... तहसीलदारांना विचारा
अंबवडे येथील दोन घरांचे पंचनामे करण्यात आले नाहीत. याबाबत तलाठ्यांना विचारले असता, ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी स्वतः फोटो काढून कार्यालयात द्यायचे आहेत. ज्यांनी दिले नाहीत, त्यांचे पंचनामे करण्याची आमची जबाबदारी नाही. चोवीस तासांत फोटो दिले असते, तर पंचनामे केले असते. आता करता येणार नाही. करायचे असतील तर तहसीलदारांशी बोला, असे सांगून तलाठ्यांनी हात वर केले.