सुपनेत लसीकरणामध्ये पारदर्शकता आणावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:24+5:302021-05-26T04:38:24+5:30

यावेळी शिवाजी पाटील, आबाईनगरचे सरपंच रमेश सुर्वे, उपसरपंच अशोक माने, उद्योजक प्रशांत पाटील, शिवसेनेचे सचिन महाडिक उपस्थित होते. निवेदनात ...

Bring transparency in vaccination in Supan | सुपनेत लसीकरणामध्ये पारदर्शकता आणावी

सुपनेत लसीकरणामध्ये पारदर्शकता आणावी

Next

यावेळी शिवाजी पाटील, आबाईनगरचे सरपंच रमेश सुर्वे, उपसरपंच अशोक माने, उद्योजक प्रशांत पाटील, शिवसेनेचे सचिन महाडिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, असंख्य ग्रामस्थ दररोज केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. या केंद्रात चौकशी विभागांतर्गत कर्मचारी नेमून योग्य माहिती व नोंदणी केली जावी. लसीच्या उपलब्धतेनुसार त्या-त्या तारखेला किती डोस उपलब्ध झाले आहेत याची माहिती फलकावर लिहावी. सुपने केंद्रांतर्गत जेवढी उपकेंद्रे आहेत त्या प्रत्येक उपकेंद्राला गावे वाटून देऊन लसीकरण करावे, तसेच केंद्रासमोर तसा माहिती फलक लावण्यात यावा. जेणेकरून ग्रामस्थांना विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आरोग्य केंद्रावर शक्य झाल्यास परिसरातील गावांना लसीकरणचा दिवस ठरवून द्यावा. त्याप्रमाणे लस आल्यानंतर नियोजन करावे. म्हणजे केंद्रावर अकारण गोंधळ व गर्दी होणार नाही.

राजकीय मंडळी, पदाधिकारी, सदस्य, संचालक, सरपंच, नेते, वशिलेबाजी करून व राजकीय दृष्टिकोनातून या मोहिमेत हस्तक्षेप करीत असतील, तसेच त्यांची शिफारस अगर टोकण देण्याचा अन्यायकारक प्रकार घडत असेल तर तो ताबडतोब बंद करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Bring transparency in vaccination in Supan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.